scorecardresearch

Viral Video: चालत्या गाडीत दिवसाढवळ्या चोरी!, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

काही व्हिडीओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. भर रस्त्यात गाड्यांची वर्दळ असताना एका गाडीतून चोरी करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Theft_Running_Tempo
Viral Video: चालत्या गाडीत दिवसाढवळ्या चोरी!, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ आहे. रोज कोणता ना कोणता व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. काही व्हिडीओ नेटिझन्सना आवडतात. तर काही व्हिडीओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. भर रस्त्यात गाड्यांची वर्दळ असताना एका गाडीतून चोरी करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चोरीचा व्हिडीओ एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकीत होत आहे. असं करताना त्यांना इतरांनी अडवलं का नाही असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तर काही जणांनी नेमके ते चोर आहेत का? की ओळखीचे आहेत? असाही प्रश्न विचारला आहे. व्हायरल व्हिडीओतील दृश्य मात्र चालत्या गाडीतून सामान परस्पर लांबवत असल्याचं दिसत आहे.

चोरी आणि स्नॅचिंगचे व्हिडीओ वेळोवेळी सोशल मीडियावर येत असतात. गुन्हेगारीचे व्हिडीओ पाहून अनेकदा राग अनावर होतो. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक बाईकच्या साहाय्याने आश्चर्यकारकपणे चोरी करताना दिसत आहेत. एक व्यक्ती चालत्या वाहनाच्या मागे लटकून सामान काढून गाडीच्या मागे दुचाकीवरून चालत असलेल्या दोन तरुणांकडे देत आहे. त्यांचा पाठलाग करणाऱ्या एका कार चालकाने हा दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडीओला २.१ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याच वेळी ६२ हजारांहून अधिक युजर्सनी लाईक केले आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्स आपल्या भावना व्यक्त करत आहे.प्रतिक्रिया देताना एका युजर्सने लिहिलं आहे की, भारतातील चोरीवर बनवलेल्या धूम चित्रपटाची सातवी आवृत्ती आहे. तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, चोरी शांतपणे होते, याला दरोडा म्हणतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Theft in a moving tempo video viral on social media rmt

ताज्या बातम्या