Hollywood Actors As Indian Monks: सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी हॉलीवूड स्टार्सचे फोटो व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर काही हॉलीवूड स्टार्सचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये काही हॉलीवूड स्टार्स हिंदू साधूंच्या वेशामध्ये दिसत आहेत. काही ठिकाणी ते पूजा करताना दिसत आहेत. हे फोटो पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. या फोटोंमागील सत्य नक्की काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.

साधूच्या वेशात दिसले हॉलीवूड स्टार?

सोशल मीडियावर व्हायरल झालेले हॉलीवू़ड स्टारचे साधूच्या वेशातील फोटो हे खरेखुरे फोटो नाहीत तर ही एक AI ची कलाकृती आहे. AI च्या माध्यामातून आजकाल कोणतीही कल्पना सत्यात उतरवणे शक्य झाले आहे. एका एआय कलाकाराने प्रसिद्ध हॉलीवूड स्टार्स जर हिंदू साधू असते तर कसे दिसले असते, अशी कल्पना करून हे फोटो तयार केले आहेत.

हेही वाचा – तासनतास सोशल मीडिया वापरता? आता पैसेही कमवा! व्हिडिओ पाहण्यासाठी ‘ही’ कंपनी देतेय ८ हजार रुपये

हे फोटो इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आले आहेत. प्रसिद्ध हॉलीवूड स्टार कीनू रीव्हस, ब्रॅड पिट, मॉर्गन फ्रीमन, टॉम क्रूझ, जॉर्ज क्लूनी, रॉबर्ट डाउनी जूनियर, लिओनार्डो डिकॅप्रियो, टॉम हँक्स, विल स्मिथ आणि हॅरिसन फोर्ड हे भारतीय साधूंच्या वेशात पूजा करत असल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे.

ही तर AIची नवी कलाकृती

हे लक्षात घ्या की, हे फोटो कितीही खरे वाटतं असले तरी ही फक्त AI कलाकाराची एक कल्पना आहे. हे फोटो पाहिल्यानंतर लोक थक्क होत आहेत आणि कित्येकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे फोटो प्रॉम्प्ट-आधारित एआय आर्ट टूल, मिडजर्नी वापरून तयार केले गेले आहेत. wild.trance नावाच्या इन्स्टाग्राम वापरकर्त्याने फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना त्याने लिहिले – ही एक कल्पना आहे. हॉलीवूड स्टार्सना भारतीय साधू म्हणून पाहणे हे फार आश्चर्यकारक आहे.

हेही वाचा – हवा तितका पिझ्झा खा अन्… मृत्यूनंतर बिल भरा! ‘या’ रेस्टॉरंटने ग्राहकांना दिली भन्नाट ऑफर

View this post on Instagram

A post shared by Jyo John Mulloor (@jyo_john_mulloor)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी हॉलीवूड स्टार्सचे केले होते एआय फोटो

हॉलीवूड स्टार्सला एआय फोटोसाठी असे पहिल्यांदाच दाखवले नाही. याआधी रमजानच्या पवित्र महिन्यात, व्यस्त असलेल्या फूड मार्केटमध्ये हॉलीवूड स्टार्सला विक्रेते म्हणून दाखवणारे एआय फोटो व्हायरल झाले आहोत. हे फोटो एआय कलाकार ज्यो जॉन मुल्लूरने (@jyo_john_mulloor) शेअर केले होते. यामध्ये केनू रीव्हज, विल स्मिथ आणि टॉम क्रूझ यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींना रात्रीच्या वेळी रस्त्यावरील खुल्या खाद्य बाजारात काम करत असल्याची कल्पना करून हे फोटो तयार केले होते.