जसे करावे तसे भरावे अशी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. अनेकजण दुसऱ्याचं वाईट चिंतायला किंवा करायला जाता आणि त्यांच्यासोबतच वाईट घटना घडते. याचा आपण जसे कर्म तसे फळ असे म्हणतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास एखाद्याचे आपण वाईट करण्याचा विचार करतो आणि आपल्या बाबतीतही वाईटच घडते. याच ताजं उदाहरण देणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक चोर महिलेचा हातातील पर्स हिसकावून पळत असतो, तेवढ्यात तिथे एक कार चालक येतो आणि चोराला चांगलाच धडा शिकवतो. चोराने केलेल्या चुकीच्या कर्माची शिक्षा त्याला लगेच मिळाल्याने तो आता पुन्हा अशी चुक करण्यापूर्वी नक्कीच १०० वेळा विचार करेल.
चोरीच्या अनेक घटनांचे व्हिडीओ आत्तापर्यंत तुम्ही पाहिल्या असतील. यात चोर बाईकवरून येत रस्त्यावरून चालणाऱ्या प्रवाशांच्या हातातील पर्स किंवा मौल्यवान दागिने हिसकावून काही क्षणात पसार होतात, त्यामुळे अशाप्रकारे चोरी करणाऱ्या चोरांना पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. पण या घटनेत चोराला लगेच कायम लक्षात राहिल अशी शिक्षा मिळाली पण त्या महिलेची पर्स देखील तिला पुन्हा मिळाली. यामुळे युजर्स आता चोराला अद्दल घडवणाऱ्या कार चालकाचे कौतुक करत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चोर बाईकवरून येतो आणि फुटपाथवरून चालणाऱ्या महिलेल्या हातातील पर्स हिसकावून पळण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी तो बाईक सुरु करणार तेवढ्यात समोरुन येणाऱ्या कार चालकाला तो चोर असल्याचे समजते, यानंतर कार चालक कसलाही विचार न करता बाईकसह चालकाला जोरदार धडक देतो आणि त्याला जोरात रस्त्यावर पाडतो. यावेळी चोर बाईक पुन्हा उचलून पळण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा कार चालक पुन्हा बाईकसह चालकाला दोनवेळा जोरात धडक देतो. यानंतर कार पुढे जाते आणि तो चोर बाईकसह उठून उभा राहतो आणि निघून जातो. पण तो कार चालक एवढ्यावरच थांबत नाही तो चक्क उलटी कार चालवत चोराचा पाठलाग करतो. चोरीचा हा धक्कादायक व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, याला म्हणतात कर्माचे फळ.