Viral Video : असं म्हणतात, आजोबा म्हणजे नातवाचा पहिला मित्र असतो. वृद्ध वयात सर्वात जास्त वेळ घालणाऱ्या त्यांच्या नातवाबरोबर त्यांचे खूप अनोखे नाते असते. सोशल मीडियावर आजोबा नातवाच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी दाखवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आजोबा नातवाचे अनेक व्हिडीओ नेहमची चर्चेत येतात. काही व्हिडीओ पाहून बालपणीची आठवण सुद्धा येते.

सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आजोबा आणि नातवाचे अनोखे नाते दाखवले आहे.हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या आजोबांची आठवण येऊ शकते.म्हातारपणी वृद्ध लोकांना खऱ्या आधाराची गरज असते. जेव्हा हा आधार त्यांचा जिवलग नातू देत असेल तर त्यांना खूप आनंद होतो. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की चिमुकला नातू आजोबांना चालताना आधार देत आहे. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तु्म्हाला हातात काठी घेऊन चालताना एक आजोबा दिसतात. पाय थकलेले, गुडघ्यांमध्ये जोर नाही, काठी टेकवत हे वृद्ध आजोबा चालताना दिसतात. अचानक तिथे एक चिमुकला येतो आणि आजोबांचा हात पकडतो आणि त्यांना घेऊन जाताना दिसतो. चिमुकला ज्या पद्धतीने आजोबांचा हात पकडून घेऊन जातो, ते पाहून तुम्हालाही तुमच्या आजी आजोबांची आठवण येईल. काहींना हा व्हिडीओ पाहून अश्रु आवरणार नाही. व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल की असा नातू सर्वांना मिळो. या व्हिडीओतून या चिमुकल्यावर चांगले संस्कार केल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : नव्या गौतमीची सगळीकडे चर्चा! गौतमी पाटील सारखी सेम टू सेम दिसणारी ही तरुणी कोण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ramjogdand21 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कमी वयात माणुस समजदार असाच होत नाही तर काहींना लोक समजदार बनवतात, तर काहींना परिस्थिती आणि समजदारीची भाषा तेच वापरतात ज्यांनी कमी वयात जास्त वाईट दिवस पाहिलेले असतात…!”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी या चिमुकल्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.