देशातील प्रत्येक लहान-मोठ्या रुग्णालयात एमआरआय मशीनचा वापर केला जातो. याचा उपयोग शरीराची तपासणी करण्यासाठी केला जातो. परंतु तुम्हाला माहितीच असेल की एमआरआय करताना, मशीनमध्ये कोणतेही दागिने, धातू घेऊन जाण्याची परवानगी नाही. यामागील कारणही खूप रंजक आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये एमआयआय मशिनमध्ये धातूला परवानगी का नाही हे दाखवले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
काही लोक एमआरआय मशीनमध्ये लोखंडापासून बनवलेल्या वस्तू ठेवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र मशीन या सगळ्या वस्तू आतमध्ये खेचत आहे. मशीनमध्ये लोखंडी खुर्ची घातली तरी ती खुर्ची आत खेचून घेतली जात आहे. वास्तविक, यामागे चुंबक हेच कारण आहे. हे यंत्र एका शक्तिशाली चुंबकाने तयार केले आहे. जे धातूपासून बनवलेल्या वस्तूंना क्षणार्धात स्वतःकडे खेचते.यामुळे लोक धातूपासून बनवलेल्या वस्तू मशीनमध्ये ठेवू शकत नाहीत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांना विश्वास बसत नाहीये.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: नवरा कसा हवा राम की रावणासारखा? तरुणीनं दिलेलं उत्तर ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
@Rainmaker1973 नावाच्या ट्विटर यूजरने हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे. आतापर्यंत ७ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याचबरोबर लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.