Radhika merchant lehenga : सोशल मीडियावर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या जबरदस्त फोटोंनी धुमाकुळ घातला आहे. तीन दिवसांच्या प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत, राधिका मर्चंट यांनी परिधान केलेल्या वेगवेगळ्या पोषाखाची सर्वत्र चर्चा आहे. हा सोहळा नसून आंतरराष्ट्रीय स्तरावरील फॅशन शो आहे असंच वाटत होतं. एखाद्या हिरॉईनपेक्षाही सुंदर आणि आकर्षक अशी राधिका मर्चंट दिसत होती. वेडिंग सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी रात्रीच्या कार्यक्रमात राधिकाने सर्वांच्या नजरा आपल्याकडे वेधून घेतल्या. अत्यंत प्रेमाने तिने ‘मोह मोह के धागे’ या गाण्यावर डान्सही केला आणि मनिष मल्होत्राने डिझाईन केलेल्या ग्लिटरी गोल्डन ऑफ शोल्डर गाऊनमध्ये तिचा लुक पाहातच राहण्यासारखा होता. प्रसिद्ध डिझाईनर मनिष मल्होत्राने यांनी राधिकासाठी डिजाईन केलेला या गाऊनची अजूनही चर्चा आहे. चला तर मग या गाऊनमध्ये असं काय खास आहे जाणून घेऊयात.

राधिका तिच्या साध्या आणि अनोख्या फॅशनसाठी ओळखली जाते. स्वारोस्की लेहेंगा परिधान केलेल्या राधिकाने या लेहेंग्याला आधुनिक ट्विस्ट दिला आहे. तीन दिवसीय प्री-वेडिंग फंक्शनच्या तिसऱ्या दिवशी, राधिकाने प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांनी डिझाइन केलेला हा निळा लेहेंगा परिधान करून सर्वांना थक्क केले.

पाहा फोटो

हेही वाचा >> विमानाच्या इंजिनमध्ये एकानं नाणं टाकलं; विमान तब्बल ४ तास खोळंबलं, नेटकरी म्हणतात…एकावं ते नवलंच!

लेहेंग्याची खासियत

हा लेहेंगा खास बनवला तो म्हणजे तो सोन्या-चांदीच्या वर्कने. तसेच त्याला स्वारोवस्की क्रिस्टल्सने सजवण्यात आलं होतं. राधिकाचा डायमंड कटवर्क ब्लाउज तयार करण्यासाठी ५७०० तासांपेक्षा जास्त वेळ लागला. याशिवाय, जागतिक स्तरावरून आणलेल्या ३००,००० हून अधिक क्रिस्टल्सचा यात वापर करण्यात आला, जो कला आणि सौंदर्य यांचा अनोखा मिलाफ दिसतो. सोन्या, चांदीच्या वर्कने भरलेल्या या लेहंग्याची किंमत नक्कीच लाखोंच्या घरात असणार. लाखो रुपयांचा हा लेहंगा सगळ्यांनाच आकर्षित करत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोबतच तिने ॲक्सेसरीजची स्टाईलही उत्तम केली आहे. राधिकाने या शिमरी लुकसह डबल लेअर्ड डायमंड नेकलेस गळ्यात परिधान केला असून त्याला मॅचिंग असे थ्री लेअर्ड डायमंडचे कानातले घातले आहेत. तर तिच्या डाव्या हातात डायमंडचे ब्रेसलेट असून उजव्या हातात हिऱ्यांच्या बांगड्या घातलेल्या दिसून येत आहे. संपूर्णतः हिऱ्यांनी राधिका मढली आहे. जो लुक अत्यंत रॉयल दिसत आहे.