तुम्ही चित्रपटांमध्ये अॅनाकोंडा पाण्यात तरंगताना पाहिला असेल, पण त्यात ग्राफिक्सचा वापर केलेला असतो. मात्र, प्रत्यक्ष जीवनात कोणीही असं पाहिले नसेल. कुठेही साप दिसला तरी लोक तिथून पळ काढतात. सापाला हाताने पकडून बाहेर फेकण्याचे धाडस लोकांमध्ये नाही. साप पकडण्यासाठी सर्पमित्राला बोलावले जाते. जंगलात असं होत नाही, कुठेतरी साप दिसला तर तिथून पाळतो.

लोकांना वाटले आश्चर्य

सहसा लोक जंगलात फिरायला जात नाहीत, पण जे जातात ते प्रत्येक धोक्यासाठी तयार असतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो कोणत्याही भीतीशिवाय धोक्याचा सामना करतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती पाण्यात बोटीवर उभ राहून मागून सापाची शेपटी पकडत असल्याचे दिसून येते. तो महाकाय सापासारखा दिसतो. हा व्हिडीओ पाहून लोक या सापाला अॅनाकोंडा म्हणत आहेत. मात्र हा व्हिडीओ कुठला आहे याची पुष्टी झालेली नाही. व्हिडीओमध्ये साप पाण्यात पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: डगआऊटमधून रिव्ह्यूसाठी सूचना; टीम डेव्हिडचं ‘ब्रेनफेड मोमेंट’, पाहा VIDEO
Vodafone Idea FPO, Vodafone-Idea,
विश्लेषण : अर्ज करावा की करू नये.. व्होडाफोन-आयडिया ‘एफपीओ’बाबत तज्ज्ञांचे मत काय?
robbing shopkeepers
दुकानदारांना लुटण्याचा हा नवीन प्रकार तुम्ही पाहिला आहे का? व्हिडीओ पाहा अन् सतर्क व्हा
Bengaluru woman slammed for phone
स्कुटर चालवताना मोबाईलवर बोलण्यासाठी काकूंचा हटके जुगाड! व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच

(हे ही वाचा: कोंबडी आणि कोब्रामध्ये रंगली लढत; कोण जिंकलं? पाहा या Viral व्हिडीओमध्ये)

(हे ही वाचा: Thar चालवतचं घेतले लग्नाचे सात फेरे; आनंद महिंद्रांनी शेअर केला Video)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

अॅनाकोंडासारखा दिसणारा महाकाय सापाचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताच लोक चक्रावून गेले आहेत. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. memewalanews नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे. सोशल मीडियावर अनेकजण हा व्हिडीओ शेअर करत आहेत. व्हिडीओ शेअर करताना मीम पेजने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘कॅमेऱ्यात कैद झालेला अॅनाकोंडा साप.’ मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे त्या व्यक्तीने त्या महाकाय सापाची शेपटी पकडली.