भारतात नागरिकांना सुरक्षितरीत्या रस्ता ओलांडण्यासाठी ठिकठिकाणी सिग्नल यंत्रणा आणि झेब्रा क्रॉसिंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली असते. पण, परदेशातील काही देशांमध्ये रस्ता ओलांडण्यासाठी काही वेगळ्या आणि अनोख्या पद्धती वापरल्या जात असल्याचं पाहायला मिळतं. सध्या रस्ता ओलांडण्यासाठी असलेल्या अशाच एका पद्धतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा अनोखा प्रकार पाहून बहुतेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय; तर काहींना हसू येत आहे.

VIDEO: भयंकर! घाबरून पळणार इतक्यात जमिनीवर पाडलं अन्…; चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला

रस्ता ओलांडण्यासाठी वापरली जाणारी ही पद्धत तुम्ही पाहिली का?

तुम्ही लोकांना वेगवेगळ्या तऱ्हेने रस्ता ओलांडताना पाहिलं असेल. काही जण रस्त्यावरील सिग्नलच्या खांबावर हिरवा दिवा लागल्यानंतर; तर काही जण वाहनं गेल्यानंतर रस्ता ओलांडतात. सिग्नल यंत्रणा नसलेल्या रस्त्यांवर लोक वाहनांना थांबण्यासाठी हात दाखवून मग रस्ता ओलांडतात. पण, तुम्ही कधी वाहनचालकांना धमकावून रस्ता ओलांडताना पाहिलं आहे का? व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला ठेवलेली वीट उचलतो आणि रस्ता ओलांडू लागतो. एखादी व्यक्ती वाहनावर वीट फेकून मारेल या भीतीनं चालक वाहन थांबवतात. त्यानंतर व्यक्ती रस्ता ओलांडते आणि तेथील स्टॅण्डवर वीट ठेवते. त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा विटांचे स्टॅण्ड बांधण्यात आले आहेत.

रस्त्या ओलांडण्याच्या या अनोख्या पद्धतीचा व्हिडीओ @Mens_Corner__ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरनं लिहिलं की, लोक सिग्नलची चिंता करणं थांबवतील. दुसऱ्या युजरनं लिहिलं- मला वाटत नाही की, चालक विटा बघून थांबतील. तिसऱ्यानं लिहिलं की, आपण विटांच्या जागी अंडी फेकून मारू शकता.