अवैधरित्या खाणकाम केल्याप्रकरणी साडे तीन वर्षे तरुंगवास भोगलेले भाजपाचे माजी मंत्री जर्नादन रेड्डी यांच्या मुलीच्या लग्नपत्रिकेची सगळीकडेच चर्चा आहे. कारण आतापर्यंत अशी लग्नपत्रिका क्वचितच कोणी पाहिली असेल. ही पत्रिका उघडल्यावर आत छोटी एलइडी स्क्रिन बसवण्यात आली आहे. पत्रिका उघडल्यावर ब्राम्हणी आणि राजीव जोडप्याचे नाव झळकत लग्नाचे संगीत वाजते. पुढे जर्नादन आणि त्यांच्या पत्नी, घरातील काही मंडळी सगळ्यांना लग्नाचे आमंत्रण देतानाचा व्हिडिओ सुरु होतो. दाक्षिणात्य सिनेमातल्या एखाद्या दृश्यासारखा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओच्या शेवटी घरातील मंडळी सगळ्यांना लग्नाची तारीख आणि स्थळं सांगत आग्रहाचे निमंत्रण देतात.
नेते मंडळी आणि त्यांच्या मुलांची लग्न नेहमीच चर्चेचा विषय असतात. लग्नसोहळ्यांवर कोटीच्या कोटी रुपये खर्च करणारे भारतातील अनेक नेते यापूर्वीही वादाच्या भोव-यात सापडले आहे. आता लग्नपत्रिकेवर एवढ्या मोठया प्रमाणात खर्च केल्यामुळे जर्नादन रेड्डी पुन्हा चर्चेत आले आहे. नोव्हेंबरमध्ये त्यांच्या मुलीचे लग्न आहे. हे लग्न मोठ्या थाटामाटात साजरे होणार आहे हे नक्की. पण या लग्नात बॉलीवूडमधील काही बडे अभिनेते आणि अभिनेत्री नृत्याच्या कार्यक्रम देखील सादर करण्याची चर्चा आहे, यासाठी शाहारुख खान आणि कतरिना कैफला हवी तेवढी रक्कम देण्याची तयारी जर्नादन रेड्डी यांनी दर्शवली असल्याचीही चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This wedding invitation of karnataka billionaires daughter has an lcd screen and its unbelievable
First published on: 19-10-2016 at 15:44 IST