Viral Video : सोशल मीडियावर अनेकदा असे काही व्हिडीओ पाहायला मिळतात; जे आश्चर्यचकित करणारे असतात, तर काही वेळा ते पाहून लोकांना हसू आवरता येत नाही. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक तरुणी रेल्वे फाटक ओलांडण्याचा प्रयत्न करते; पण ती अपघातात सापडते. हा अपघात असा काही होता की, जो पाहून तुम्हाला धक्का न बसता, हसू येईल. कारण- यात रेल्वे फाटक ओलांडण्यासाठी तरुणीने असे काही केले की, जे पाहूनच अनेकांना हसू येत आहे. हा व्हिडीओ सध्या खूप वेगाने व्हायरल होतोय.

रेल्वे फाटक ओलांडण्याच्या प्रयत्नात अडकली तरुणी

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्रेन येण्यापूर्वी रेल्वे फाटक बंद करण्यात आले; जेणेकरून कोणीही रूळ ओलांडून जाणार नाही आणि कोणतीही दुर्घटना घडणार नाही. परंतु, असे असतानाही काही लोक जीव धोक्यात घालून रेल्वे फाटक ओलांडताना दिसत आहेत. याचदरम्यान एक मुलगी स्कुटीवर बसून रेल्वे फाटकाजवळ पोहोचली आणि ती हाताने फाटकाचे गेट वर करून रेल्वे फाटक ओलांडण्याचा प्रयत्न करीत होती. पण, यावेळी तिच्याच चुकीमुळे अपघात झाला.

व्हिडीओमध्ये दिसतेय की, तरुणीने गेट उचलून जबरदस्तीने ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचा तोल गेला आणि स्कुटीसह ती ट्रॅकवर पडली. सुदैवाने त्यादरम्यान कोणतीही ट्रेन न आल्याने कोणताही मोठा अपघात झाला नाही; अन्यथा तिला जीव गमवावा लागला असता. मात्र, या व्हिडीओतील त्या तरुणीची कृती पाहून अनेकांना हसू आवरणे अवघड झाले आहे.

कारण- व्हिडीओमधील त्या तरुणीने खाली उतरून रेल्वे फाटक वर न करता, शॉर्टकटच्या नादात एका हाताने फाटकाचे गेट वर केले; पण तोच गेट तिच्या डोक्यात पडला आणि ती खाली कोसळली. इतकेच नाही, तर तिच्या स्कुटीवरील सामानही खाली पडले; पण विशेष बाब म्हणजे तेथे असलेले इतर लोक माणुसकीच्या नात्याने तिला मदत करण्याऐवजी तिच्या बाजूने ‘कट’ मारून निघून जात होते.

@Nshaileshyadav नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तो पाहिल्यानंतर लोक भरपूर कमेंट्स करीत आहेत. गेट बंद केल्यानंतरही ते ओलांडणे धोकादायक ठरू शकते, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, आजकालच्या मुलीही रिक्स घेण्यापासून मागे हटत नाहीत. तिसऱ्या एकाने लिहिले की, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मला हसू आवरता येत नाही. लोक जाणूनबुजून अशी रिस्क का घेतात?

चौथ्याने लिहिले की, ही घटना केवळ मुलींबरोबरच नाही, तर कुणासोबतही घडू शकते. रेल्वे फाटक ओलांडताना काळजी घेतली पाहिजे. शेवटी एकाने लिहिले की, असे रेल्वे फाटक ओलांडणे चुकीचे आणि धोकादायक आहे.