Viral Video: अलीकडे दिवसेंदिवस सोशल मीडिया वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कधी कोणते व्हिडीओ व्हायरल होतील हे सांगता येत नाही. त्यावर अनेक प्राण्यांचे गमतीशीर व्हिडीओदेखील खूप चर्चेत असतात; ज्यात कधी मांजर, कुत्रा, माकड अशा विविध प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. नुकताच असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे; ज्यामध्ये एक माकड एका तरुणाचा पाठलाग करताना दिसत आहे; जे पाहून तुम्हाला हसू येईल.

सोशल मीडियावर अनेकदा माकड आणि इतर प्राण्यांचे अनेक गमतीशीर व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आपण पाहतो. त्यामध्ये कधी माकड इतर प्राण्यांसह खेळताना दिसते; तर कधी ते एकमेकांशी भांडताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये माकड चक्क जिममध्ये येईल त्या तरुणाचा पाठलाग करीत आहे. हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माकड जिममध्ये शिरते आणि तिथल्या एका तरुणाचा पाठलाग करतो. तो तरुण जिममध्ये ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी माकड त्याचा पाठलाग करते. यावेळी जिममध्ये इतर काही तरुणदेखील उपस्थित होते; पण माकड केवळ त्याच तरुणाचा पाठलाग करते. बराच वेळ पाठलाग करूनही ते माकड पाठलाग सोडत नाही. त्यावेळी तो तरुण घाबरून तोंडातून चित्र-विचित्र आवाज काढतो; पण माकड त्या आवाजाला अजिबात घाबरत नाही. पुढे हा तरुण घाबरून इतर तरुणांच्या मागे लपण्याचा प्रयत्न करतो; पण माकड तिथेदेखील येते.

हेही वाचा: लग्नाचा मांडला बाजार; भरमांडवात नवरीला बेशुद्ध करून लावलं लग्न, पुढे जे घडलं… Viral Video एकदा पाहाच

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ll___sankar या अकाउंटवरू शेअर करण्यात आला असून, त्यावर चार लाखांहून अधिक व्ह्युज मिळाल्या आहेत. त्याशिवाय ११ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाइक केले आहे. या व्हिडीओवर अनेक जण कमेंट्स करतानाही दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “बिचाऱ्याच्या मागे हात धुऊन लागला आहे.” तर दुसऱ्याने लिहिलेय, “मागच्या जन्मात हा तुमचा मुलगा होता वाटतो.” तिसऱ्या एकाने लिहिलेय, “तू टार्गेट आहे त्याचं.” तर आणखी एकाने लिहिलेय, “तू आवडलास वाटते त्याला”. तर, आणखी एकाने लिहिलेय, “भावा, कदाचित तू अजून जिमचे पैसे नाही भरलेस.”