Dhoom Style Theft Video Viral : चोरटे बाईकवरून आले अन् चालत्या गाडीतील सामान चोरी करून गेले, अशा प्रकारची अनेक दृश्ये तुम्ही आतापर्यंत चित्रपट, वेब सीरिजमध्ये पाहिली असतील. अशाच चोरीशी संबंधित ओटीटीवर आलेली Money Heist ही वेब सीरिज तर खूप मोठ्या प्रमाणात ‘हिट’ झाली. चोरटे चोरी करण्यासाठी काही वेळा एकदम खतरनाक शैली वापरतात. काही वेळा चोर ज्याचा कधी कोणी विचारही केला नसेल अशा स्टाईलने चोरी करतात. सध्या सोशल मीडियावरही चोरीच्या घटनेचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहताना आपण चित्रपटातील चोरीचे दृश्य तर बघत नाही ना, असा भास होईल. कारण- यात चोरटे चक्क धावत्या ट्रकवर चढून सामान चोरी करताना दिसतायत. चोरीच्या या थरारक घटनेचा हा व्हिडीओ आग्रा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील आहे; जो पाहून तुमच्याही अंगावर शहारे येतील.

या व्हिडीओमध्ये तीन चोरटे जीव धोक्यात घालून अशा प्रकारे चोरी करतायत की, पाहताना तुम्हालाही भीती वाटेल. चोरी करण्यासाठी त्यांनी एवढी जोखीम पत्करली आहे की, पाहणाऱ्यालाही घाम सुटेल.

जीव धोक्यात घालून चोरी

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आग्रा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर तीन चोर बाईकवरून एका ट्रकचा पाठलाग करीत चोरी करतात. त्यापैकी दोघे धावत्या ट्रकवर चढतात आणि ताडपत्री कापून त्यातील मालाने भरलेली एक भली मोठी गोणी खाली रस्त्यावर फेकतात. यावेळी तिसरा बाईकवरून ट्रकच्या मागोमाग येत असतो. मालाची गोणी खाली फेकताच ट्रकवर चढलेले दोघे तरुण एक-एक करून ट्रकच्या मागोमाग येणाऱ्या त्यांच्या साथीदाराच्या चालत्या बाईकवर येऊन बसतात. त्यानंतर ट्रक पुढे निघून जातो. ट्रकच्या मागे असलेल्या कारमधील कोणीतरी या चोरीच्या थरारक घटनेचा व्हिडीओ शूट करून तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल

@iamnarendranath नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी ट्रकचालकाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अनेक जण ही चोरी ट्रकचालकाच्या संगनमताने झाली का? ट्रकचालकही यात सहभागी आहे का, असे प्रश्न उपस्थित करीत आहेत.

तसेच ट्रकच्या दोन्ही बाजूंना आरसे असतात आणि त्या दोन्ही आरशांमध्ये ट्रकचालकाचे लक्ष असते. मग अशा वेळी ट्रकचालकाला ते दिसले नाही का? ट्रकचा वेग न वाढल्याने त्याचा चालकदेखील चोरांना साथ देत होता का? अशी शंका काही जण उपस्थित करीत आहेत.