Viral Video : आनंद असो किंवा दुःखाचा प्रसंग, काही जणांना मद्यपान केल्याशिवाय रहावत नाही. मग वयोमानाबरोबर मद्यपान करण्याची लागलेली सवय अगदी अखेरच्या श्वासापर्यंतची गरज ठरून जाते. पण, अति प्रमाणात मद्यधुंद अवस्थेत असणारी व्यक्ती आपण काय करतोय? आपण कुठे जातोय? याचे भान विसरून जाते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ३० फूट लांब जलद वाहणाऱ्या नाल्यात एक मद्यधुंद माणूस अडकलेला पाहायला मिळाला आहे व त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

व्हायरल व्हिडीओ नोएडामधील आहे. शुक्रवारी २४ मे २०२४ रोजी एक घटना घडली. एक मद्यधुंद व्यक्ती ३० फूट लांब वेगाने वाहणाऱ्या नाल्यात पडली. नाल्यातून त्या व्यक्तीच्या ओरडण्याचा आवाज स्थानिकांना ऐकू आला व परिसरात एकच खळबळ उडाली. हे कळताच स्थानिकांनी वेळीच घटनास्थळी पोलिसांना बोलावून घेतले व पोलिस काही वेळात घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिकांनीही पोलिसांना मदत केली. कशाप्रकारे मद्यधुंद तरुणाला बाहेर काढण्यात आलं, एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा पाहा.

हेही वाचा…एक-एक पैसे जमवून बांधलं घर; हातभार लावणाऱ्या रिक्षालाही दिली ‘त्याने’ घरात जागा, मालकाचा हा VIDEO पाहून म्हणाल…’वाह’

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, ३० फूट लांब वेगाने वाहणाऱ्या नाल्यात मद्यधुंद व्यक्ती अडकलेली असते. हे कळताच घटनास्थळी जाऊन पोलिस अधिकारी स्थानिकांबरोबर नाल्याच्या आतमध्ये जाऊन व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. ४५ मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. ही घटना कळताच तेथील नागरिकांनी या परिसरात गर्दी केली व व्यक्तीला बाहेर काढण्यापर्यंत पोलिसांना सहकार्य करताना दिसले. मद्यधुंद अवस्थेत असणारी व्यक्ती सुखरूप बाहेर आल्यावर तेथील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ नोएडा पोलिसांच्या अधिकृत @noidapolice या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेचे वर्णन करून एक व्हिडीओदेखील चित्रित केला आहे व मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या व्यक्तीची कशी सुटका केली हे देखील त्या व्हिडीओत दाखवण्यात आले आहे. तसेच कॅप्शनमध्ये ‘११२ वर कॉल केल्यावर, @noidapolice त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिकांच्या मदतीने यशस्वीरित्या व्यक्तीची त्यांनी सुटका केली’; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.