Tim Cook Twitter: Apple सीईओ टिम कूक सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यामागे खास कारण म्हणजे भारतात apple चे रिटेल स्टोअर सुरु झाले आहेत. यापैकी देशातील पहिल्या रिटेल स्टोअरचे उदघाट्न टिम कूक यांनी केले आहे. तर दुसरे स्टोअर दिल्ली येथे सुरु होणार असल्याची माहिती समोर येत आहे. टिम कूक यांनी भारतभेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची सुद्धा भेट घेतली. या भेटींचे फोटो टिम कूक यांनी स्वतः शेअर केलेले आहेत. अलीकडेच त्यांनी संदीप रानडे या तरुणाची भेट घेतली व त्याच्या संगीत क्षेत्रातील भन्नाट कल्पनेविषयी स्वतः ट्वीट करून कौतुक केले आहे.

टिम कूक यांच्या माहितीनुसार संदीप रानडे यांनी किडडोपिया या कंपनीने बनवलेल्या नादसाधना अ‍ॅपची माहिती दिली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रीस्कूल मधील लहान मुलांना संगीत शिकण्यात मदत करण्याचा संदीप रानडे यांचा मानस आहे. प्राप्त माहितीनुसार ही एक AI आधारित प्रणाली आहे ज्याने संगीत शिकण्यास मदत होऊ शकते. टिम कूक लिहितात की, “नादसाधना मधील संदीप रानडे यांनी मिले सूर मेरा तुम्हारा या गाण्यावर दमदार परफॉर्मन्स दिला. भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील डेव्हलपर मंडळी जगावर यशस्वी प्रभाव पाडत आहेत.”:

टिम कूक यांनी मराठमोळ्या तरुणाचे केले कौतुक

हे ही वाचा<< Apple चे CEO टीम कूक यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; ट्विटरवर पोस्ट शेअर करत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, टिम कूक यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यावर सुद्धा एक खास पोस्ट करून Apple भारतभर विस्तार करण्यासह गुंतवणूक करण्यासाठी देखील कटिबद्ध आहे असे लिहिले होते. टिम कूक यांनी आतापर्यंत, बॅडमिंटन प्रशिक्षक गोपीचंद, सायना नेहवाल, माधुरी दीक्षित, दत्तराज नाईक (म्युरल पेंटर) तसेच अनेक संस्थांची सुद्धा भेट घेतली आहे.