Today’s Viral News Updates : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर..
Trending News Live Updates, 28 May 2025
भयंकर! महाकाय शार्कने जिवंत मगरीला क्षणात गिळलं, तोंड जबड्यात पकडलं अन्…; पाहा धडकी भरवणारा VIDEO
मगरींबद्दल बोलायचे झाले तर हा फार भयानक प्राणी आहे, जो सिंहाचीही शिकार करायला मागेपुढे पाहत नाही. पण, सोशल मीडियावर आता मगरीच्या शिकारीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक विशाल शार्क समुद्रात जिवंत मगरीला गिळताना दिसतोय. शिकारीचे हे भयानक दृश्य पाहून तुमचाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. सविस्तर वाचा...
किती हुशार आहे! समोर होते विजेच्या तारांचे कुंपण, हत्तीने थेट…..; Viral Video पाहून तुम्हालाच बसेल धक्का
बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल
हवामान केंद्राने पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.यंदा राज्यात पावसाचं आगमन लवकर झालंय. मात्र, या पावसानं राज्यातील अनेक भागांना झोडपून काढलंय. दरम्यान अशाच एका गावात अख्खा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेलाय. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सविस्तर बातमी...
मिटिंग सुरू असताना बिस्किट खात होती पुण्यातील तरुणी, मॅनेजर मेसेज करून म्हणाला, “प्लिज,…”, पाहा Viral Post
पुणेकर कधी काय करतील हे सांगता येत नाही हे सिद्ध करणारे कित्येक किस्से आणि घटना रोज समोर येत असतात. पुण्यातील रिक्षाचालकांपासून पुणेरी पाट्यांपर्यंत अनेक गोष्टी चर्चेत असतात. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये रेनकोट घरी विसरल्यानंतर चक्क कारचे कव्हर डोक्यावर धरून तीन तरुण दुचाकीवरून प्रवास करत होते. आता पुन्हा एका पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होत आहे पुण्यातील एका महिलेने मिटिंगमध्ये तिच्या मॅनेजरने तिला लिहिलेल्या मेसेजचा खुलासा केल्यानंतर नेटकऱ्यांना हसू आवरणे अशक्य झाले. या पोस्टवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. सविस्तर बातमी...