देशातील अनेक राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. राजस्थानमध्ये तर यावेळी पावसाने सर्व विक्रम मोडले आहेत. अचानक पडलेल्या पावसामुळे जोधपूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर पुरासारखे पाणी वाहत आहे. याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये पुराच्या पाण्यात काही दुचाकी खेळण्यांप्रमाणे वाहून गेल्याचं दिसत आहे, ज्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

राजस्थानमध्ये पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही शिवाय भारतीय हवामान खात्याने (IMD) राजस्थानमध्ये पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ज्यामुळे नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे. संततधार पावसामुळे राज्यातील सर्व धरणे क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे आता आणखी पाऊस पडला तर पुराची भीषण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.

हेही पाहा- पुरात वाहून जाणाऱ्या गायीचे तरुणांनी वाचविले प्राण, मुस्लीम तरुणाचीही मिळाली साथ; Video पाहून तुम्हीही कौतुक कराल

जोधपूर शहरातील पुराचे भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये, शहरातील रस्त्यांवर नदीच्या प्रवाहासारखे पाणी वाहत असल्याचं दिसत आहे. या पाण्याच्या प्रवाहात अनेक बाईक आणि स्कूटी खेळण्यासारख्या तरंगताना दिसत आहेत. तर एका व्हिडीओमध्ये दुचाकीवर बसलेले तरुण बाईकसह पाण्यात पडल्याचं दिसत आहे. एका घरातून काही महिला ही सर्व थरारक घटना पाहताना दिसत आहेत. याचवेळी काही लोकांनी आपल्या घरातून रस्त्यावरुन धावणाऱ्या पाण्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट केला होता, जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुरात वाहने वाहून जातानाचा व्हिडीओ एएनआयच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे, “जोधपूरमध्ये मुसळधार पावसामुळे शहरात पाणी साचले असून अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक दुचाकी पाण्यात वाहून गेल्या आहेत.” तर या पुराचे आणखी काही व्हिडीओ नागरिक शेअर करत आहेत. जे पाहिल्यानंतर तेथील परिस्थिती किती भयानक आहे याचा अंदाज लावता येऊ शकतो.