Twitter Trends: जगभरातील अपडेट्स जाणून घ्यायचं ठिकाण म्हणजे ट्विटर. या ट्विटरवर फक्त माहिती नव्हे तर अनेक बातम्यांवरील मजेशीर ट्विट्सने सुद्धा ट्विटरवर मीम्सचा पूर आलेला असतो. अगदी ट्वीन टॉवर कोसळला तेव्हा ते भारत पाकिस्तान मैदानात आमने सामने आले तेव्हा सुद्धा ट्विटरवर भन्नाट मीम्स नेटकऱ्यांना माहिती देताना मनोरंजनही करत असतात. असाच एक ट्विटर ट्रेंड सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ट्विटरवर ‘RS 25’ हे अवघे दोन शब्द जवळपास प्रत्येक दुसऱ्या ट्विट मध्ये दिसतायत. याचं कारण ऐकाल तर तुम्हीही थक्क व्हाल.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईमध्ये १९९३ साली झालेले साखळी बॉम्बस्फोटांबरोबरच शस्त्रास्त्रांची तस्करी, अमली पदार्थांची तस्करी, बनावट नोटा प्रकरण, दहशतवादी हल्ले अशा अनेक गुन्ह्यांमधील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमला पकडण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने २५ लाखाचे मोठे बक्षीस जाहीर केले आहे. पाकिस्तानी यंत्रणांच्या मदतीने दहशतवादी हल्ले घडवून आणल्याचा आरोप दाऊदवर आहे.

(Asia Cup 2022: अफगाणिस्तानच्या ‘त्या’ सुंदरीला पाहून नेटकरी म्हणतात मॅच बघायला येऊ नको नाहीतर आम्ही..पाहा Photos)

दाऊदला पकडून देणाऱ्याला २५ लाख, छोटा शकीलला पकडून देणाऱ्याला २० लाख तर अनीस, चिकना आणि मेननला पकडून देणाऱ्याल प्रत्येकी १५ लाख रुपये बक्षीस दिलं जाणार आहे. या २५ लाखाच्या पार्श्वभूमीवर ट्विटरवर ‘RS 25’ हा हॅशटॅग तुफान व्हायरल होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी यावरून मजेशीर मिम्स सुद्धा बनवले आहेत. अनेकांनी तर पाकिस्तानने पैसे मिळवण्यासाठी ही संधी स्वीकारायला हवी असा सल्ला दिला आहे.

RS25 मीम्स

दरम्यान, हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार एनआयएच्या एका अधिकाऱ्याने गुप्ततेच्या अटीखाली दिलेल्या माहितीनुसार तपास यंत्रणांनी दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम ऊर्फ हजी अनीस, दाऊदचा जवळचा सहकारी जावेद पटेल ऊर्फ जावेद चिकना, शकील शेख ऊर्फ छोटा शकील यांच्यासोबतच इब्राहिम मुश्ताक अब्दुल रझाक मेमन ऊर्फ टायगर मेमन यांना पकडून देणाऱ्यांसाठीही बक्षिसांची घोषणा केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००३ मध्ये सुद्धा संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीकडून दाऊदला पकडून देणाऱ्याला यापूर्वीच २५ मिलियन अमेरिकी डॉलर्स बक्षिस देण्याची घोषणा करण्यात आली होती. प्राप्त माहितीनुसार दाऊद सध्या पाकिस्तानमधील कराचीत वास्तव्यास आहे.