तरुण मुलं-मुली एकमेकांच्या प्रेमात असतात तेव्हा एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात. जसजसं नातं बहरत जातं तसतशी एकमेकांप्रति आपुलकी वाढत जाते. हे नातं अधिक घट्ट करण्यासाठी मोठमोठ्या व महागड्या भेटवस्तू एकमेकांना दिल्या जातात; पण ब्रेक-अप झाल्यावर एका तरुणाने जे काही केलं, त्याबद्दल सध्या बरीच चर्चा सुरू आहे. त्याबद्दल जाणून घेऊ या.प्रेमात असताना प्रेयसीवर प्रियकराने जो काही खर्च केला होता, तो खर्च पद्धतशीरपणे शीटमध्ये नमूद करून प्रियकराने प्रेयसीकडे पाठवून तो परत मागितला आहे. ऐकताना ही घटना फार मजेशीर वाटत आहे; पण पूर्वीच्या प्रियकराने केलेली ही कृती तरुणीच्या मनाला लागली.

बॉयफ्रेंडने घेतला बदला

एली ही ऑस्ट्रेलियातील एडेलेडची रहिवासी आहे. ती तिचा पार्टनर एलेक्ससोबत रिलेशनशिपमध्ये होती. नुकतेच त्यांचं नातं तुटलं. टिकटॉकवरील या घटनेचा संदर्भ देत 22 वर्षीय तरुणीने सांगितले की, तिच्या माजी प्रियकराने तिला आतापर्यंत झालेल्या खर्चाची यादी दिली आहे. ज्यामध्ये खाणंपिणं आणि सिनेमाच्या तिकिटांसह अनेक खर्चाचा समावेश आहे. आता ते दोघे एकत्र नसल्यामुळे यातील निम्मा खर्च प्रेयसीने द्यावा अशी त्याची इच्छा आहे. दोघंही नात्यामध्ये असताना आनंदानाने केलेल्या खर्चाची लिस्ट एक्स बॉयफ्रेंडने पाठवल्यावर तिनं त्याचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा फोटो –

हेही वाचा – विमान उडवून कंटाळा आलाच तर, पायलट काय करतात? जाणून घ्या अतिशय रंजक उत्तर

आयलने शेअर केलेल्या या स्क्रीनशॉटमध्ये पेट्रोलपासून खाण्यापर्यंत सर्वच खर्च नमूद केलेला आहे. सध्या या घटनेची चर्चा रंगली आहे.