तंत्रज्ञानाच्या मदतीने आजकाल अनेक अवघड कामं सोप्या पद्धतीने करता येतात. शिवाय तंत्रज्ञान जसंजसं प्रगत झालं तसं संपुर्ण जग जवळ आलं आहे. इंटरनेटने तर सर्व सीमा ओलांडत जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील लोकांना एकमेकांच्या जवळ आणलं आहे. याच तंत्रज्ञानाचा वापर करत एका महिलेने बालपणीच्या मैत्रिणीचा शोध घेतला आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

नेहा नावाच्या महिलेने इंस्टाग्रामवर तिच्या अंगणवाडीतील मैत्रीण लक्षिताचा शोध घेण्यासाठी एक अकाऊंट सुरु केले होते. शिवाय तिचे पूर्ण नाव आठवत नसल्यामुळे नेहाने @finding_Lakshita असे अकाऊंटचे नाव ठेवले आणि तिच्या मैत्रीणीचा एक फोटो त्या अकाऊंटवर पोस्ट केला. बायोमध्ये, तिने नेटकऱ्यांना सांगितले की, हे अकाऊंट सुरु करण्याची उद्दिष्ट लक्षिताला शोधणे हे आहे, जी आता २१ वर्षांची झाली असेल, मी माझी बालपणीची हरवलेली मैत्रीण “लक्षिता” वय २१ आणि तिचा भाऊ कुणाल यांना शोधत आहे.”

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नेहाने सांगितले की, तिने तिच्या मैत्रिणीच्या नावाने सोशल मीडियावर लोकांना मेसेज करायला सुरुवात केली. शेवटी ती लक्षिताला शोधण्यात यशस्वी झाली आणि त्या दोघी पुन्हा एकमेकींना भेटल्या. शिवाय तिने आपल्या इंस्टाग्रामच्या अकाऊंटचा बायो देखील अपडेट केला आहे. ज्यामध्ये तिने लिहिलं, “मिशन यशस्वी झाले. शेवटी मी तिला शोधलं”. तिच्या वैयक्तिक प्रोफाइलवरून व्हिडीओ शेअर करताना नेहाने लिहिलं, “शेवटी, मी तुला शोधलं बरं… तुला शोधणं सोपं नव्हतं पण तरीही मी ते केलं! जवळपास १८ वर्षांनंतर तुझ्याशी संपर्क साधणं अवास्तव वाटतं आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेहाने सांगितले लक्षिता नावाची माझी एक मैत्रीण होती, ती जयपूरला गेल्यामुळे माझा तिच्याशी संपर्क तुटला. मला तिचे आडनावही आठवत नव्हते. शिवाय नेहाने काही दिवसांपूर्वी या संपुर्ण घटनेशी संबंधित घटनेचा एक व्हिडिओ शेअर केला होता. जो नेटकऱ्यांना आवडला असून सध्या तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत तो ७ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर साडेसात लाखाहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. “तू मला रडवलंस” अशी कमेंट लक्षिताने केली आहे. तर एका नेटकऱ्याने, मी अजूनही माझ्या बालपणीच्या मित्राला शोधत आहे. माझ्याकडे त्याचा फोटो देखील नाही, आशा आहे की मला तो लवकरच सापडेल, अशी कमेंट केली आहे.