School Teacher Viral Dance Video: सोशल मीडियावर आपल्याला डान्सचे असंख्य व्हिडिओ पाहायला मिळतात. कोणी लग्नात कोणी भर रस्त्यावर तर कधी ट्रेनमध्येही डान्स करतानाचे व्हिडिओ आत्तापर्यंत समोर आले आहेत. ज्यामधील अनेक व्हिडिओंनी नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. दरम्यान एका महिला शिक्षिकेनं चक्क शाळेच्या वर्गातच विद्यार्थ्यांसोबत भोजपूरी गाण्यावर डान्स केला आहे. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्सने संताप व्यक्त करत शिक्षिकेच्या निलंबनाची मागणी केली आहे.

शाळेतील वर्गात एक महिला शिक्षिका विद्यार्थ्यासोबत भोजपूरी गाण्यावर डान्स करताना या व्हिडीओत दिसते. ‘तेरी आख्या का यो काजल’ या सपना चौधरीच्या गाण्यावर या तरुण शिक्षिकेने डान्स केला आहे. शिक्षिका विद्यार्थ्यांसोबत ठुमके लगावताना दिसते. या डान्सचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. नेटिझन्सने या व्हिडीओला पाहिल्यानंतर संताप व्यक्त करत शिक्षिकेला निलंबित करण्याची मागणी केली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – धबधब्यावर स्टंटबाजी! शेवाळलेल्या दगडावरुन थेट तोंडावर आदळली तरुणी, VIDEO पाहून येईल अंगावर काटा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारण शिक्षिकेनं केलेलं वर्तन शाळेतील नियमांचं उल्लंघन करणारं आहे, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून अश्लील मेसेज पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असं एका युजरने म्हटलं आहे. “शिक्षक समाजाचा आरसा आहेत त्यामुळं शिक्षिकेनं अशा प्रकारचं कृत्य करणं चुकीचं असून विद्यार्थ्यांनाही त्यांनी चांगलं शिकवलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या युजरने दिली आहे.