सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे गमतीशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये प्राण्यांनी विनाकारण त्रास देणाऱ्यां लोकांचा पाठलाग केल्याचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. अशा व्हिडीओंमध्ये म्हशी आणि बैलांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. अनेकवेळा हे प्राणी भरधाव वाहनांचा पाठलाग करताना दिसतात तर कधी माणसांवर हल्ला करताना. मात्र, सध्या एका वळूचा असा व्हिडीओ व्हायरल होत आहे तो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

हेही पाहा- पाळीव कुत्र्याच्या एका चुकीमुळे घर आगीत जळून खाक; मालकीन हेअर ड्रायर बेडवर ठेवून गेली अन्…

कारण या व्हिडिओमध्ये एक वळू चक्क घराच्या छतावर चढल्याचं दिसत आहे. शिवाय घरावर चढलेला वळू खाली कशाप्रकारे येतोय हे पाहिल्यावर तुमच्या अंगावर शहारे येतील. या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाचा वळू घराच्या छतावर चढल्याचं दिसत आहे. तो घरावर गेल्यानंतर तेथून खाली येण्यासाठी त्याला रस्ता न मिळाल्याने तो संतापल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

हेही पाहा- Video: शाळकरी विद्यार्थ्यांसमोरच शिक्षिका एकमेकींशी भिडल्या, मुलं थांबा म्हणत होती आणि त्या केस ओढत राहिल्या

संतापलेला हा वळू खाली यायला रस्ता सापडेना म्हणून घरावरुन थेट खाली उडी घेतो. मात्र, या वळून मारलेली उडी पाहून तिथे उपस्थित असणारे अनेक लोक भीतीने पळताना दिसत आहेत. शिवाय या घटनेचा व्हिडीओ एका व्यक्तीने मोबाईलच्या कॅमेऱ्यात शूट केला आणि तो इंटरनेटवर पोस्ट केल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. शिवाय हा वळू घरावर गेलाच कसा असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ajayattri_52 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, तो आतापर्यंत १ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी तो लाईक केला आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, ‘आधी तो वळू तिथे कसा पोहोचला ते सांगा?’ तर दुसर्‍याने लिहिलं आहे की, त्या वळूला देखील खूप लागलं आहे. दरम्यान, अनेकांनी हा व्हिडीओ बनवणाऱ्यावर टीका केली आहे. व्हिडीओ काढण्यापेक्षा त्या वळूची मदत करायला हवी होती असंही काही नेटकरी म्हणत आहे.