मित्राचं लग्न म्हटलं की तरुणांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. शिवाय आपल्या जिवलग मित्राच्या लग्नात आपण काय काय मज्जा करायची याचं प्लॅनिंग काही मुलं लग्न ठरल्यापासून करतात. शिवाय नवरदेवालादेखील आपले मित्र लग्नात काहितरी गोंधळ घालणार याची कल्पना असतेच. नवरदेवाच्या मित्रांनी लग्नात मस्ती केल्याचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असतो.

सध्या अशाच तीन तरुणांचा आपल्या मित्राच्या संगीत कार्यक्रमात केलेला भन्नाट डान्स व्हायरल होत आहे. या मुलांनी मुलींनाही लाजवेल असा डान्स केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत देवदास चित्रपटातील ‘मार डाला’ या गाण्यावर तीन मित्र नाचताना दिसत आहेत. शिवाय या गाण्यावर माधुरी दीक्षित यांनी ज्याप्रकारे नृत्य केलं आहे अगदी त्याचप्रकारे हे तरुण नाचताना दिसत आहेत. त्यामुळे मुलांचा हा डान्स पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

हेही पाहा- गायीच्या वासराला सीट बेल्ट लावून कारमधून फिरवणाऱ्या तरुणीचा Video व्हायरल; नेटकरी म्हणाले, “आपल्या देशाची…”

या तीन मित्रांची जुगलबंदी पाहून उपस्थितांना आपलं हसू आवरणं कठीण झाल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे. महत्वाची बाब म्हणजे हा डान्स पाहणाऱ्या मुलींनीदेखील या मुलांना दाद दिली आहे. व्हायरल होत असलेल्या या तरुणांच्या डान्सचा व्हिडीओ monassingh नावाच्या इंस्टाग्राम पेजपरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “या लोकांना फेमिनिन गाण्यावर परफॉर्म करण्यासाठी केवळ ०.५ सेकंद लागले आणि मला त्यांच्यातील ही गोष्ट आवडली आहे.” या व्हिडिओमध्ये, तिन्ही मित्र हिरव्या रंगाचा स्कार्फ घालून भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. या मित्रांनी केलेल्या डान्सची सध्या नेटकऱ्यांना भुरळ पडली आहे.

हेही पाहा- Video: वंदे भारत एक्सप्रेसमध्ये सेल्फी काढण्याचा मोह नडला, इच्छा नसताना १५० किमीचा प्रवास घडला

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सुरुवातील तिन मित्र स्टेजवर येताना दिसत आहेत. ज्यांच्या डोक्यावर हिरवे दुपट्टेही आहेत. हे तिन मित्र स्टेजवर येतात आणि अचानक नाचायला सुरुवात करतात. हे पाहून उपस्थित पाहुणेही थक्क होतात. शिवाय या मुलांना बरोबर डान्सच्या स्टेप्स केल्याचं पाहून तिथे उपस्थित असणाऱ्या महिलादेखील टाळ्या वाजवत त्या मुलांचे मनोबल वाढवत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by @monassingh

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवदास या हिंदी सिनेमातील लोकप्रिय साउंडट्रॅक “मार डाला” या गाण्यावर ही मुंल अगदी उत्तम डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीलाही या मुलांचे अप्रुप वाटेल यात शंका नाही. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो १ मिलियनहून अधिकवेळा पाहिला गेला आहे.