सोशल मीडियावर मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींप्रमाणे क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटीही फारच सक्रीय असतात. खास करुन क्रिकेटमधील अनेक खेळाडू सोशल मीडियावर सक्रीय आहेत. या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी कनेक्टेड राहण्याचा नवीन पर्याय खेळाडूंनाही उपलब्ध झाला आहे. मात्र कधीतरी खेळाडूंकडून केल्या जाणाऱ्या पोस्ट या ट्रोलिंगचा विषय ठरतात. असाच काहीसा प्रकार एका क्रिकेटपटूबरोबर नुकताच घडला असून या क्रिकेटपटूने चक्क स्वत:चा न्यूड फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केला होता. त्याच्या इन्स्ताग्राम स्टोरीचे स्क्रीनशॉट सध्या व्हायरल होत असून अनेकजण त्याला यावरुन ट्रोल करत आहेत.
वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू आंद्रे रसेलने आपला एक न्यूड मिरर सेल्फी इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये पोस्ट केला होता. आंद्रे रसेलने हा फोटो १८ नोव्हेंबर रोजी पोस्ट केला होता. ही स्टोरी सध्या २४ तासांच्या कालमर्यादेच्या नियमानुसार दिसत नसल्याची चर्चा असली तरी ही स्टोरी आंद्रे रसेलनेच डिलीट केली आहे. या स्टोरीचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आंद्रे रसेलनेच ती डिलीट केली.
अनेकांनी आंद्रे रसेलसारख्या अष्टपैलू खेळाडूने अशा गोष्टी पोस्ट केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे.

ट्विटरवरही आंद्रे रसेलच्या या इन्स्टाग्राम स्टोरीचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले असून अनेकजण त्यावर मजेदार कमेंट करुन आंद्रे रसेलला ट्रोल करत आहेत. “रणवीर सिंगकडून प्रेरणा घेऊन” अशी कमेंट एकाने या फोटोवर केली आहे. तर अन्य एकाने ‘वेलकम’ चित्रपटामधील ‘भाईसाहाब ये किस लाइन मे आ गये आप’ हा संवाद पोस्ट करत आंद्रे रसेलला ट्रोल केलंय. तुम्हीच पाहा हा व्हायरल फोटो आणि त्यावर आलेल्या काही मोजक्या प्रतिक्रिया…
१) एवढे कपडे असून नागडा फिरतोय…
२) याला झालंय तरी काय?
३) विराटच्या रिअॅक्शनच्या मिम्समधूनही प्रतिक्रिया

४) कुठं आलाय तू मित्रा…
५) प्रेरणास्त्रोत रणवीर
६) वेस्ट इंडिजच्या टी-२० विश्वचषक कामगिरीचं प्रतिनिधित्व करणारा फोटो
७) दहाव्या सेकंदाला स्क्रीनशॉट घेतलाय यांनी
८) स्वस्तातला रणवीर सिंग…
९) वेस्ट इंडिज क्रिकेटची परिस्थिती
१०) याने तर केकेआरलाच दोष दिलाय
दरम्यान, इंडियन प्रिमियर लीगच्या २०२३ च्या पर्वामध्ये आंद्रे रसेल कोलकाता नाईट रायडर्सच्या संघातून खेळणार आहे. रिटेन्शन राऊंडदरम्यान केकेआरच्या संघाने आंद्रे रसेलला पुढील पर्वासाठीही संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच आंद्रे रसेल भारतीय क्रिकेट चाहत्यांना आयपीएलमध्ये शाहरुख खानच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. मात्र या गोष्टीला अजून काही महिन्यांचा वेळ असला तरी या न्यूड मिरर सेल्फीमुळे आंद्रे रसेल अचानक चर्चेत आलाय हे मात्र नक्की.