Viral video: आपण कितीही सावधगिरी बाळगली तरीदेखील अनेकदा दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघात घडतात. नुसतं गाडी चालवतानाच नाही तर रस्त्यावरून चालतानादेखील लोकांनी लक्ष ठेवलं पाहिजे. अशातच प्राण घ्यायला आलेल्या यमराजाला माणसाने परत पाठवल्याचं तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं आहे. असं प्रत्यक्षात शक्य नाही हे आपल्यालाही माहिती आहे, कारण मृत्यू कुणाच्या हातात नाही. पण, तरी फिल्मी लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्ये असा चमत्कार दिसून आला. दोन चिमुकल्यांनी खरंच यमराजाला चकवा दिला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, “नशिबापुढे देवाचंही नाही चालत”

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्याच्या कडेला दोन मुलं खेळताना दिसत आहेत. यावेळी त्यातला एक मुलगा अचानक बाजुच्या दुकानाकडे पळत जातो आणि एक जण रस्त्याच्या कडेलाच उभा दिसत आहे. अशातच नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव वेगात एक ट्रक या मुलांच्या दिशेने येतो. या ट्रकचा वेग इतका होता की क्षणात नेमकं काय झालं कळलंच नाही. व्हिडीओमध्ये सुरुवातीला असं वाटतं की या दोन्ही मुलांना ट्रकनं चिरडलं आणि त्यांचा अपघात झाला मात्र पुढे पाहिलं तर चमत्कारिकरित्या ही दोन्ही मुलं सुखरुप आहेत. अगदी समोरुन मरण गेल्यासारखं ही मुलं यातून बचावली.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, नशीब असावं तर असं.

. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचं धस्स होईल. या व्हिडीओतून वेळेची किंमत न करणाऱ्यांना किंवा सर्वांनाच एका सेंकदाचीही काय किंमत असते हे कळेल.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सर्वांसाठी एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे. आपण सर्वांनी रस्त्याने चालताना तसेच गाडी चालवताना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जर तुम्ही सावधगिरी बाळगली, तर तुम्ही अशा अपघातांपासून स्वत:ला तसेच इतरांना वाचवू शकता. नेटकरीही व्हिडीओवर कमेंट करत आहेत, एकानं म्हंटलंय” नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला” दुसऱ्या युजरने प्रतिक्रिया दिलीय “नशीब आणि कर्मावर ज्यांना विश्वास नाही त्यांनी हे पाहाव.”