scorecardresearch

Premium

Video: तुफान राडा! आधी मारहाण, मग एकमेकांचे ओढले केस; मुंबई लोकलमध्ये महिलांची दे दणादण फायटिंग

Mumbai Local Ladies Coach Video : मुंबई लोकलमधील महिलांच्या मारामारीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

two women inside mumbai local train slapping each other pulling hair watch viral video
Video: तुफान राडा! आधी मारहाण, मग एकमेकांचे ओढले केस; मुंबई लोकलमध्ये महिलांची दे दणादण फायटिंग ( photo – @mumbaimatterz )

Mumbai Local Viral Video:  ट्रेन आणि मेट्रोलमधील महिला आणि तरुणींची भांडणे आता काही नवीन नाहीत. एकदा का या महिला भांडायला लागल्या लागल्या तर कोणाचंही ऐकत नाहीत. चर्चेने सोडवता येणारी भांडणं अनेकदा हाणामारीवर येऊन पोहचतात.
कधी सीटवरून तर कधी ट्रेनमध्ये उभं राहण्यावरून महिलांमध्ये वाद होत असतात. यावेळी महिला अगदी पुरुषांप्रमाणे हाणामारी करतात. मुंबई लोकलमधील असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन महिला क्षुल्लक गोष्टींवरुन भांडतात आणि नंतर एकमेकींचे केस ओढू लागतात.

या व्हिडीओमध्ये एका खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये दोन महिला कोणत्यातरी मुद्द्यावरून एकमेकांशी जोरजोरात भांडू लागतात. बराच वेळ वाद घातल्यानंतर दोघी एकमेकांना हाताने मारु लागतात. यावेळी एक महिला दुसऱ्या महिलेला जोरात कानाखाली वाजवते, त्यानंतर दुसरी महिलाही कानाखाली वाजवण्यासाठी पुढे येते. यानंतर दोघींची मारामारी सुरु होते, दोघीही एकमेकींचे केस ओढू लागतात. यावेळी शेजारी उभ्या असलेल्या लोकांनी मध्यस्थी करत दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याकाही थांबण्याचे नाव घेत नव्हत्या.

This guy was teasing and passing bad comments on every girl on Road,and then police gave him treatment in Gujarat video
गुजरातमध्ये रस्त्यावर दिसेल त्या तरुणीला, महिलेला रोड रोमिओची शिवीगाळ; संतापजनक VIDEO व्हायरल
viral video Three men rescued after they drive SUV into fast flowing river
भलतं धाडस पडलं महागात! तरुणांनी थेट नदीत उतरवली कार अन्….; थरारक व्हिडीओ पाहून अंगावर येईल शहारा
pharma employee opens pasta stall in evening on weekends to follow her passion goes viral
जिद्दीला सलाम! दिवसभर फार्मा कंपनीमध्ये करते जॉब, ऑफिस सुटताच विकते पास्ता, ‘या’ तरुणीची प्रेरणादायी कथा एकदा वाचा
Mumbai Local Viral Video Beautiful Marathi Ladies In Nauvari Saree Dance On Baipan Bhari Deva People Ask How Train in Emptyप
मुंबई लोकलमध्ये ‘एवढी’ जागा असते? बोरिवली ट्रेनमधील महिलांचा सुंदर Video पाहून म्हणाल, “बाईपण भारीच”

यावेळी एका महिलेने कसेतरी दुसरीच्या हातून आपले केस सोडवत स्वत:ची कशीतरी सुटका करुन घेतली. यानंतर प्रकरण शांत झाले. या घटनेने मुंबई लोकलमध्ये प्रवाशांना विशेषत: महिलांना रोजच्या रोज कोणकोणत्या आव्हानांना आणि गैरसोयींना सामोरे जावे लागते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

ट्रेनमध्ये काढला घरचा राग!

@mumbaimatterz नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे जो आता व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर यूजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिले की, घरचा राग ट्रेनमध्ये येऊन काढला, काळजी घ्या. दुसरा एक युजर म्हणाला की- हे पाहून खूप वाईट वाटले. मात्र, मुंबई लोकलमधील असे दृश्य पाहण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी महिला ट्रेनमध्ये सीटवरून एकमेकांसह भांडतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two women inside mumbai local train slapping each other pulling hair watch viral video sjr

First published on: 25-09-2023 at 20:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×