‘आरआरआर’ हा भारतीय ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक आहे, ज्याने यावर्षी ऑस्कर पुरस्कार पटकावला. चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने ऑस्कर जिंकल्यानंतर भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये इतिहास रचला आहे. या गाण्याला फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये भरपूर पसंती मिळाली. देश-विदेशातही अनेक ठिकाणी ‘नाटू-नाटू’ची क्रेझ पाहायला मिळाली. दरम्यान आता युक्रेनच्या सैनिकांनादेखील ‘नाटू नाटू’ गाण्याचे वेड लागलेलं दिसतंय. सोशल मीडियावर युक्रेनच्या सैनिकांचा ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा गाण्याचे बोल युक्रेनियन भाषेतील आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?

Tim David's Six Hits Fan On His Face
DC vs MI : टीम डेव्हिडच्या षटकाराने चाहता झाला जखमी, झेल घेण्याच्या नादात तोडांवर आदळला चेंडू
Ukraine Russia war takes a new turn
युक्रेन-रशिया युद्धाला नवे वळण; अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांनी रशियाच्या लष्करी तळांवर हल्ले
wresters deepak punia sujeet denied entry to asia olympic qualifiers tournament
आशिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत दीपक, सुजितला प्रवेश नाकारला! दुबईतील पावसामुळे बिश्केकमध्ये पोहोचण्यास उशीर
two accused arrested in Salman Khan house firing case (1)
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक, पोलिसांनी व्हिडीओ केला शेअर

सध्या रेडिटवर युक्रेन लष्कराचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये युक्रेनी सैन्यातील दोन सैनिक ‘नाटू नाटू’ या गाण्यावर अभिनेता रामचरण आणि ज्युनिअर एनटीआरसारखे डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये युक्रेन सैनिकांचा हा जबरदस्त डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कित्येक सोशल मीडिया यूजरने या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – बसनंतर आता आली डबल डेकर सायकल! व्हिडिओ पाहून लोक म्हणाले, ”आजोबा जुगाड जबरदस्त आहे पण…”

‘नाटू नाटू’ गाण्याबद्दल…
‘नाटू नाटू’ गाणे हे राहूल सिपलीगंज आणि काल भैरवा यांनी एकत्र गायले आहे. या गाण्याचे लिरिकल व्हर्जन १० नोव्हेंबर २०२१ला प्रसिद्ध केले होते. या गाण्याचा पूर्ण व्हिडिओ ११ एप्रिल २०२२ रोजी प्रसिद्ध झाला होता. या गाण्याचे तमिळ व्हर्जन, ‘नाटू कोथू’, कन्नडमध्ये ‘हल्ली नाटू’, मल्यालम व्हर्जनमध्ये ‘करिनथोल’ आणि हिंदी व्हर्जन ‘नाचो नाचो’ या नावाने रिलीज करण्यात आले होते. गाण्याच्या व्हिडिओमध्ये चित्रपटातली अभिनेते रामचरण तेजा आणि ज्युनिअर एनटीआर यांनी अफलातून डान्स केला आहे. गाण्याची कोरिओग्राफी प्रेम रक्षितने केली आहे.

हेही वाचा – आयपीएलदरम्यान जखमी गुडघ्यावर पट्टी बांधून मैदानात उतरला MS Dhoni, व्हिडिओ होतोय व्हायरल

युक्रेनच्या राष्ट्रपती भवनामध्ये झाले होते ‘नाटू नाटू’ गाण्याचे शूट

रशिया-युक्रेनचे युद्ध सुरू होण्याच्या काही महिने आधीच ‘नाटू-नाटू’ हे गाणे मरिंस्की पॅलेसमध्ये (युक्रेनच्या राष्ट्रपती भवनात) शूट केले होते. हे गाणे ऑगस्ट २०२१ मध्ये शूट केले होते. गाण्याचा हूक स्टेप इतका व्हायरल झाला की लोक त्यावर डान्स करत व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. ‘नाटू नाटू’ गाणे रिलीज झाल्यानंतर फक्त २४ तासांमध्ये त्याच्या तेलगू व्हर्जनने १७ लाखांचा आकडा पार केला होता. हे तेलगूमध्ये सर्वात जास्त पाहिले जाणारे गाणे ठरले आहे.

युक्रेनचा रशियाविरुद्ध सुरु आहे संघर्ष

२०२२च्या फेब्रुवारी महिन्यात युक्रेन -रशिया युद्धाला सुरुवात झाली. खरेतर सोव्हिएत युनियनचे नव्वदच्या दशकाच्या अखेरीस विभाजन झाले आणि अनेक देश उदयास आले. यामध्ये स्वतंत्र झालेल्या युक्रेन (Ukraine) या देशामध्ये अनेक उपयुक्त असलेली संसाधने होती. सोव्हिएत युनियनसाठी ही संसाधने महत्त्वाची होती. त्यामुळे हा भाग पुन्हा काबीज करण्याचा प्रयत्न रशिया (Russia) फार पूर्वी पासून करत होता. या दोन शेजारी राष्ट्रांमध्ये तेव्हापासून कुरघोडी सुरू होत्या, पण या प्रकरणाने २०२२ मध्ये नवे वळण घेतले. २०२१-२२ च्या सुमारास युक्रेनने रशियाच्या (Ukraine Russia Crisis) विरोधात असलेल्या नाटो संघात सहभागी होण्याचे ठरवले. हा निर्णय आपल्यासाठी धोकादायक आहे असे जाणवल्यानंतर रशियाने त्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. नाटो संदर्भातील निर्णयामुळे युक्रेनला अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राची मदत मिळणार होती. या पार्श्वभूमीवर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले. २०२२ मध्ये रशियाने युक्रेनच्या सीमावर्तीय भागांमध्ये सैन्य पाठवले. या युद्धामध्ये दोन्ही देशांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. तेव्हापासून युक्रेनचा रशियाविरोधात अजूनही संघर्ष सुरू आहे. दरम्यान युक्रेनच्या सैनिकांनी ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स करत रशियाला आव्हान दिले आहे. तसेच या व्हिडिओमध्ये त्यांनी ड्रोनद्वारे बॉम्ब हल्ल्याचे यशस्वी प्रात्यक्षिक देखील दाखवले आहे.