Unhygienic vegetables video : पावसाला सुरूवात होताच वातावरण बदल आणि दूषित पाण्यामुळे वेगवेगळे इन्फेक्शन आणि आजारांचा धोका वाढत असतो. पावसाच्या दिवसांमध्ये पालेभाज्या खाताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण या दिवसात फळं किंवा पालेभाज्यांवर कीटकनाशकांचे फरावे मारले जातात. रसायनिक खतांचा अधिक वापर केला जातो. त्यामुळे कीटकनाशक औषधांमुळे अधिक नुकसानकारक होतात. सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, असं म्हणत आपण आहारात सर्व भाज्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा विचार करीत असलो तरी त्याची दुसरी बाजू गंभीर आहे. कारण- भाजी मंडईभोवती अस्वच्छता वाढली आहे. त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या पालेभाज्या आरोग्यासाठी अपायकारक ठरत असून, ग्राहक भाजी घेतात की आजार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. इथपर्यंत ठीक होतं; मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून भाज्या थेट आता शेतातूनच आणायच्या का, असा सवाल उपस्थित होतोय.

कारण- आता विक्रेते बाजारात प्रचंड केमीकल मारलेल्या भाज्या विकत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये गृहिणीने फ्लॉवरची भाजी विकत आणली होती, ही भाजी बनवण्यााधी तिनं नीट पाहिली त्यानंतर जे झालं ते पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भाजा घेताना १०० वेळा विचार कराल हे नक्की…

बाजारात जेव्हा कधी आपण पालेभाज्या विकत घेण्यासाठी जातो तेव्हा त्या अगदी हिरव्यागार आणि ताज्या असाव्यात हे आपण कटाक्षाने निरखून पाहत असतो. पण बाजारातून आपल्या ताटापर्यंत येणाऱ्या या पालेभाज्या नेमक्या कशा पिकवण्यात आल्या आहेत किंवा कुठून आल्या आहेत याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? नसेल तर सध्या व्हायरल झालेला एक व्हिडीओ पाहून तु्म्ही भाजी घेताना १०० वेळा विचार कराल. हा व्हिडीओ पाहून हे पाहिल्यानंतर तुमचेही डोळे विस्फारतील. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गृहिणी फ्लॉवरमध्ये असलेली गोम दाखवत आहे. ही विषारी गोम फ्लॉवरच्या आतमध्ये वळवळताना दिसत आहे. ही जर पोटात गेली तर विचार करा काय होईल. या महिलेनं नीट पाहिलं त्यामुळे मोठा धोका टळला अन्यथा आरोग्यावर गंभीर परिणाम झाला असता.

पाहा व्हिडीओ

हा प्रकार पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. “लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे,” “जगायचं की नाही” अशा प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. बाजारात आधीच भेसळयुक्त खाद्यपदार्थांमुळे ग्राहक फसवले जात आहेत. तेल, मसाले, दूध यांसारख्या मूलभूत वस्तूंमध्ये भेसळ ही नित्याचीच बाब बनली आहे.