UPSC CSE Prelims Result 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) घेण्यात आलेल्या नागरी सेवा (CSE) आणि भारतीय वन सेवा (IFS) संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. २५ मे रोजी देशभरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा पार पडली होती. यूपीएससीने निकालाची पीडीएफ अधिकृत वेबसाईटवर अपलोड केलेली आहे. या निकालात जे परीक्षार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत त्यांचा रोल नंबर देण्यात आला आहे.
लाखातील काही हजारच मुख्य परीक्षेसाठी पात्र
या परीक्षेला सुमारे १० लाख उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यापैकी काही हजारच उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर यशस्वी उमेदवारांच्या रोल नंबरसह गुणवत्ता यादी पीडीएफ स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
How to check the results of UPSC prelims 2025? निकाल जाहीर झाल्यावर तो कसा डाउनलोड करायचा यासाठी काही सोप्या स्टेप्स-
UPSC प्रिलिम्स २०२५ चा निकाल कसा तपासायचा?
- सुरुवातीला यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्या.
- त्यानंतर ‘UPSC Civil Service Preliminary Results for 2025’ या लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर एक पीडीएफ स्क्रीनवर दिसेल. त्यामध्ये पात्र सर्व उमेदवारांचे परीक्षा क्रमांक असतील. त्यामध्ये तुमचा नंबर तुम्ही शोधू शकता.
- उमेदवाराला निकाल डाउनलोड करण्याचा आणि सेव्ह करण्याचा पर्याय आहे.
UPSC Civil Services Examination (CSE) 2024 Prelims cut-off: 2024 सालचा यूपीएससी पूर्व परीक्षेचा कट ऑफ-
मागील वर्षांचा म्हणजेच 2024 कट-ऑफ पाहिला तर तो त्यापूर्वीच्या वर्षापेक्षा (2023) वाढताना दिसला होता. 2024 मधील सामान्य वर्गासाठी (General category) कट-ऑफ ८७.९८ गुण होता, तर OBC वर्गासाठी ८७.२८ गुण आणि EWS प्रवर्गासाठी ८५.९२ गुण कट-ऑफ नोंदवण्यात आला होता.

पात्र उमेदवारांपुढे आता मुख्य परीक्षेचे आव्हान
पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना आता मुख्य परीक्षेच्या तयारीला लागण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निकालामुळे अनेक होतकरू तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या असून, देशाच्या प्रशासकीय सेवेत दाखल होण्याच्या त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळाली आहे.