Viral Video : भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीचे जगभरात अनेक चाहते आहेत. क्रिकेटपटूसह तो एक चांगली व्यक्ती म्हणून सुद्धा लोकांना आवडतो. विराट कोहलीचे लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत लाखो चाहते आहेत. सध्या त्याच्या एका चाहतीने सोशल मीडियावर सर्वांचे मन जिंकले. ही चाहती कोणी साधी व्यक्ती नसून युपीएससी २०२३ च्या परिक्षेत तिसरा क्रमांक मिळवणारी एक हुशार विद्यार्थीनी आहे. सध्या तिचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये युपीएससी परिक्षेत तिसरा क्रमांक मिळवणारी अनन्या रेड्डीने विराट कोहली तिचा आदर्श असल्याचे सांगितले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

काय म्हणाली अनन्या रेड्डी?

व्हिडीओमध्ये अनन्या रेड्डी सांगते, “विराट कोहली, माझा आवडता खेळाडू आहे आणि मला वाटते की त्यांच्यामध्ये एक प्रेरणा आहे आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती आहे. शिस्त और त्यांचे काम विराट कोहलीकडून शिकण्यासारखे आहे. याच कारणांमुळे ते माझ्यासाठी प्रेरणादायी व्यक्ती आहेत”

हेही वाचा : VIDEO : सर्कसमधून पळाला हत्ती; भर रस्त्यात धावणाऱ्या हत्तीला पाहून लोकांची उडाली तारांबळ; व्हिडीओ व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ

या व्हिडीओवर लाखो युजर्सनी बघितला आहे. व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी अनन्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलेय, “प्रेरणादायी व्हिडीओ” तर एका युजरने लिहिलेय, “प्रत्येक हुशार व्यक्तीसाठी कोहली आदर्श आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “किंग कोहली द ग्रेट”

हेही वाचा : निलगायीची बाईकला धडक! शिंग छातीत घुसल्याने तरुणाचा मृत्यू; Video पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहे अनन्या रेड्डी?

अनन्या रेड्डी दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊसची माजी विद्यार्थीनी आहे अनन्या रेड्डीने दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊसमधून भूशास्त्र विषयात बीए पदवी प्राप्त केली. २०२१ मध्ये पदवी घेतल्यानंतर तिने हैदराबादमध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली आणि विशेष म्हणजे तिने पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास केली. सध्या तिचे सोशल मीडियावर खूप कौतुक केले जात आहे.