UPSC Topper Ishita Kishore Marksheet Viral: केंद्रीय लोकसेवा आयोगाचा सिव्हिल सर्व्हिसेस फायनलच्या निकालात इशिता किशोर हिने नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.इशिता किशोरने संपूर्ण भारतात अव्वल स्थान पटकावले आहे. निकालाच्या दिवशीच यूपीएससी टॉपर इशिता किशोर हिच्या मॉक मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत झाला होता. तर आता इशिता किशोरच्या मार्कशीटचा फोटो व्हायरल झाला आहे. तर गरिमा लोहियाने ऑल इंडिया रँक 2 आणि उमा हराथी हिने तिसरा क्रमांक मिळविला आहे. काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या तिघींच्याही मार्कशीटचे फोटो व्हायरल होत आहेत.

प्राप्त माहितीनुसार इशिता किशोरने २०१७ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्रात पदवी पूर्ण केली आहे. त्यानंतर तिने अर्न्स्ट अँड यंगसोबत रिस्क अॅडव्हायझरीमध्ये काम केले. इशिता किशोरने तिसर्‍या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिच्या मार्कशीटवर नजर टाकल्यास इशिता किशोरने २०२२ च्या UPSC परीक्षेत अव्वल येण्यासाठी एकूण १०९४ गुण – लेखी ९०१ गुण आणि PT (पर्सनॅलिटी टेस्ट) मध्ये १९३ गुण मिळवले आहेत.

Savitribai Phule Pune University
‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’मध्ये आता गुद्द्यांची नवी संस्कृती; विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांतील हिंसक प्रकरणांमध्ये वाढ
ai technology marathi crime news
“मी इन्स्पेक्टर विजयकुमार बोलतोय..”, AI चा वापर करून ५८ वर्षीय महिला प्राध्यापिकेची फसवणूक; १ लाखांचा गंडा!
ssc recruitment 2024 career in staff selection commission jobs under the staff selection commission
नोकरीची संधी : ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’मधील संधी
Pavan Davuluri
मायक्रोसॉफ्टची धुरा भारतीय वंशाच्या पवन दावुलुरी यांच्या हाती; जाणून घ्या त्यांची कारकीर्द?

तर दुसरीकडे, यूपीएससी परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळवणारी गरिमा लोहिया ही मूळची बिहारमधील बक्सरची आहे. गरिमा लोहिया यांनी दिल्ली विद्यापीठाच्या किरोरी माल महाविद्यालयात शिक्षण घेतले. गरिमा लोहियाने UPSC परीक्षेत १०६३ गुण मिळवले आहेत, ज्यात लेखी परीक्षेत ८७६ आणि PT मध्ये १८७ गुण आहेत. हैदराबाद येथील उमा हारथी एन हिने UPSC परीक्षेत 2022 मध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. उमाने लेखी परीक्षेत १०६० आणि पर्सनॅलिटी टेस्टमध्ये १८७ गुण मिळवले आहेत.

UPSC टॉपर इशिता किशोर मार्कशीट

इशिता किशोर UPSC टॉपर मार्कशीट (फोटो: सोशल मीडिया)

हे ही वाचा<< Maharashtra SSC Result 2023: दहावीचा निकाल आज! कधी, कुठे व किती वाजता पाहाल रिझल्ट? फॉलो करा ‘या’ स्टेप्स

दरम्यान, दिल्लीच्या इशिता किशोरसह यंदाच्या वर्षी भारतीय प्रशासकीय सेवेसाठीच्या परीक्षेतील पहिले चार क्रमांक हे मुलींनी पटकावले आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या एकूण ९३३ जणांमध्ये ३२० मुली आहेत.