ICC T20 World Cup: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषक २०२२ तयारी करत आहे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पहिली आयसीसी स्पर्धा खेळणारी टीम इंडिया या मेगा स्पर्धेत २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल. या सामन्यात पार्टनरला पाठिंबा देण्यासाठी अनेक खेळाडूंच्या पत्नी व कथित गर्लफ्रेंड्स ऑस्ट्रेलियाला पोहोचल्या आहेत. भारताचा गोलंदाज युजवेंद्र चहल धनश्री वर्मा सुद्धा काल ऑस्ट्रेलियाला पोहोचली. यावेळी धनश्रीने इंस्टाग्रामवर खास पोस्ट करून चहलसहित टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या, पण यापेक्षा धनश्रीची एक खास पोस्ट सध्या चर्चेत आहे. धनश्रीने या पोस्टमधून उर्वशी रौतेलाला थेट टार्गेट केले आहे.

आपल्याला माहीतच असेल की, टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला पोहोचताच पाठोपाठ उर्वशी रौतेला सुद्धा ऑस्ट्रेलियात गेली होती, यावेळी अनेकांनी उर्वशी ऋषभसाठीच गेली आहे असे म्हणत तिला ट्रोल केले होते. ऑस्ट्रेलियाला जातानाही उर्वशीने माझं हृदय मला घेऊन जात आहे असे म्हणत पोस्ट केली होती. ट्रोलिंग नंतर उर्वशीने ही पोस्ट एडिट करून फक्त ईमोजीचे कॅप्शन लिहिले. नेमक्या याच पोस्टवरून आता चहलच्या धनश्रीनेही निशाणा साधला आहे.

धनश्रीने उर्वशीच्या विमानातील फोटोची कॉपी करून ” माझं हृदय मला ऑस्ट्रेलियाला घेऊन जात आहे, खरंच!” असं कॅप्शन दिलं, पण मी माझ्या नवऱ्याला पाठिंबा देण्यासाठी जात आहे असेही पुढे धनश्री म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनश्री वर्मा इंस्टाग्राम पोस्ट

दरम्यान, धनश्रीने ही पोस्ट अगदीच मस्करीत केली असली तरी उर्वशीला ट्रोल केलेलं पाहून ऋषभ पंतचे चाहते खूपच खुश झाले आहेत, आपण धनश्रीच्या पोस्ट खालील कमेंटवरून याचा अंदाज घेऊच शकता. आता उर्वशी यावर काही प्रतिक्रिया देणार का हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.