आजकाल शिक्षण पूर्ण होण्याचा अवकाश की लगेच नोकरी मिळवण्याचे वेध लागतात. कारण, सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये फार स्पर्धा निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जास्त पगाराची चांगली नोकरी मिळवण्याकडे बहुतेकांचा कल असतो. त्यासाठी त्यांची जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाण्याची तयारी असते.करोना महामारीपासून जगभरात नोकऱ्यांची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. अनेक बड्या कंपन्या बंद झाल्या तर काही कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला, त्यामुळे जगभरातील लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. मात्र जगभरात असे अनेक लोक आहेत जे अनोख्या कल्पनांच्या मदतीने घरात बसून लखपती बनत आहेत. मात्र जगात एक असाही जॉब आहे, जिथे लाखो रुपयांचं पॅकेज दिलं जात आहे, मात्र कोणीही काम करायला तयार नाही.

अबब १ कोटींचं पॅकेज

सोशल मीडियावर नोकरीची ही ऑफर चर्चेचा विषय ठरत आहे. या जाहिरातीनुसार ही नोकरी टॉवर लालटेन चेंजरची आहे. अमेरिकेच्या साऊथ डेकोटा भागामध्ये ही नोकरी मिळत आहे. मात्र टॉवर लालटेनचा जॉब वाटतो तितका सोपा नाही. हे टॉवर सामान्य टॉवरपेक्षा वेगळे असतात. जमिनीपासून टॉवरच्या टोकाच्या दिशेने जाताना तो निमुळता होत असल्याने ही चढाई अत्यंत अवघड होत जाते. एवढच नाही तर टॉवरच्या टोकावर १०० किमी प्रती तासाच्या वेगाने वारा वाहतो. या टॉवरवर चढताना फक्त एका दोरीचा सहारा असतो. टॉवरवर चढण्यासाठी तब्बल ३ तासांचा कालावधी लागतो तसंच उतरायलाही तेवढाच वेळ लागतो. म्हणजेच काम करण्यासाठी ६-७ तास लागतात. प्रत्येक ६ महिन्यांमधून एकदा किंवा दोनदाच टॉवरवर बल्ब बदलण्यासाठी जावं लागतं. कंपनी या कामासाठी १००००० पाऊंड म्हणजेच जवळपास १ कोटी रुपये वर्षाला द्यायला तयार आहे.

हेही वाचा – Video: चित्ता गुपचूप गाडीजवळ येऊन उभा राहिला, अचानक चालकाने दरवाजा उघडला आणि…थरकाप!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहेत अटी

या जाहिरातीला टिकटॉक युजर @Science8888 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलं होतं, मात्र यासाठीच्या अटी पाहून तुम्हीही गोंधळून जालं. कारण, काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तीला उंचीची भीती नसावी, तसंच तो शारिरिकदृष्ट्या फिट असला पाहिजे. एका वर्षाचा अनुभव असलेली व्यक्तीही या जॉबसाठी अप्लाय करू शकते. तसंच पगार अनुभवावर आधारित असेल. नोकरी मिळाल्यानंतर व्यक्तीला सहा महिन्यांमध्ये एक किंवा दोन वेळा टॉवरवर चढावं लागेल.