Mazya Baya Bhukalyan Ga Little Girl Dance Video viral : सोशल मीडियावर नेहमीच नवनवीन गाणी चर्चेत येत असतात. आज काल ट्रेंडिंग गाण्यावर नाचतानाचे व्हिडिओ अनेकजण पोस्ट करतात आणि ट्रेंडमध्ये सहभागी होतात. अगदी लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वजण कोणत्या कोणत्या ट्रेंडिंग गाण्यावर थिरकताना दिसतात. हिंदी, इंग्रजीबरोबर आता मराठी गाणी देखील चर्चेत येत आहे. मराठी लोकगीते, आग्री-कोळी गीते अशी अनेक प्रकारची गाणी नव्याने लोकांसमोर येत आहे. नुकताच बाई..सुया घे गं, दाभण घे गं या लोकगीतावर अभिनय करणाऱ्या तरुणींचा व्हिडिओ चर्चेत आला होता. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला. आता असाच एक आग्री गीतावर नाचणाऱ्या चिमुकलीचा व्हिडिओ समोर आला आहे. “अगं साजणे, माझ्या बाया भुकल्यान गं” गाण्यावर नाचणाऱ्या चिमुकलीचा उत्साह, ऊर्जा आणि नृत्य पाहून नेटकरी थक्क झाले आहे.
व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर tashvi_bhoir_official नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये “अगं साजणे, माझ्या बाया भुकल्यान गं” गाण्यावर एक चिमुकली अत्यंत उर्जेने आणि उत्साहाने नाचत आहे. व्हिडीओमध्ये तिने आग्री कोळ सारखा दिसणारा पोशाख परिधान केला आहे. नाकात नथनी देखील घातली आहे. गाण्याच्या बोल आणि तालावर ती थिरकत आहे. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव नेटकऱ्यांचे मन जिंकून घेत आहे.
गाण्याचे बोल
स्वयंपाक कर तू डाळ भात
जिऱ्या-मिऱ्याची चटणी वाढ…
स्वयंपाक कर तू डाळ भात
जिऱ्या-मिऱ्याची चटणी वाढ
जेवायला बघतान वाटं गं, बाया..जेवायला जेवायला बघतान वाटं गं….
गं सुंदरा, बायांना कवरी भूक लागली बघ….
अगं साजने, माझ्या बाया भुकल्यान गं…
अगं साजने, माझ्या बाया भुकल्यान गं.
व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करून तिचे तोंडभरून कौतुकही केले आहे.
व्हिडीओवर कमेंट करतना एकाने लिहिले की, प्रत्येक “आई-बाबाच्या ओटीत अशी एक मुलगी हवी.”
दुसऱ्याने कमेंट केली की, इंस्टागावर नंबर वन गाण्यावर खरा डान्स केला आहे. सलाम तुला पोरी, खरोखर ही मुलगी लक्ष्मी आहे.”
तिसऱ्याने कमेंट केली की, “ही मुलगी बहुतेक सर्वांचे इंस्टा अकाऊंट बंद पाडते काय? अप्रतिम डान्स.”
चौथ्याने कमेंट केले की,: या गाण्याला सर्वाधिक शोभेल असा डान्स म्हणजे तुझा आहे. खूप छान डान्स केला आहे”
पाचव्याने कमेंट केली, सर्वांपेक्षा वेगळं काहीतरी ताई. छान डान्स केला. महाराष्ट्राला मागे टाकले.”
सहाव्याने कमेंट केली, परफेक्ट डान्स केला, दहावेळा बघितला आहे. छान”
सातव्याने लिहिले की, प्रत्येक आई-बाबाच्या ओटीत अशीच एक मुलगी दे रे बा विठ्ठला!
आणखी एकजण म्हणाला की, काय उर्जा आहे! सलाम आहे तुझ्या डान्सला”