Hardik Pandya Viral Video: भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या टी २० सामन्यांचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्याने एका खास पार्टीचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हार्दिक पांड्याने न्यूझीलंड विरुद्ध दौऱ्यात मेन इन ब्ल्यूच्या टी २० संघाचे कर्णधारपद भुषवले. अष्टपैलू पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध १-० असा विजय मिळवला होता. यानंतर टीम इंडियाचा संघ भारतात परतला आहे. या विजयाचे सेलिब्रेशन करताना काल पांड्यासह टीम इंडियाचे आजी माजी खेळाडू पार्टी करताना दिसले. या पार्टीत पांड्यासह टीम इंडियाचा माजी कर्णधार. कॅप्टन कूल एम एस धोनी सुद्धा कमाल डान्स मूव्ह्ज करताना दिसला.

आपण पांड्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये धोनीचा जलवा पाहू शकता. रॅपर बादशाह सुद्धा या व्हिडिओमध्ये गाणी गाताना दिसत आहे, तर टीम इंडियाचे खेळाडू एकदम कूल अंदाजात बादशाहच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. यावेळी पांड्या व धोनीचा लुकही एकदम क्लासिक दिसत आहे. पांड्याने व्हिडीओ शेअर करताना आमचे मूव्ह्ज, आमची मजा, आमची आवडती गाणी असे कॅप्शन दिले आहे.

हार्दिक पांड्याने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. मात्र मिसेस पांड्या म्हणजेच नताशा स्टॅंकोव्हिकची कमेंट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नताशाने या व्हिडिओवर फायर ईमोजी पोस्ट केले आहेत.

(फोटो: इंस्टाग्राम/@HardikPandya )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय सामने सुरु आहेत. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया एकदिवसीय सामन्यांमध्ये उतरली आहे. यात पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर विजय मिळवला होता, तर दुसरा सामना पावसाच्या संततधारेमुळे रद्द करण्यात आला होता. आता पुढील सामन्यात टीम इंडियाला टिकून राहण्यास विजय प्राप्त करणे आवश्यक आहे अन्यथा न्यूझीलंड २-० च्या फरकाने किंवा सामना रद्द झाल्यास १-० च्या फरकाने विजयी होऊ शकतो.