Airplane Door Opened In Mid Air Video: लँडिंगच्या अगदी काहीच क्षण आधी एका प्रवाशाने एशियना एअरलाइन्सच्या विमानाची आपत्कालीन एक्झिट उघडल्याचा प्रकार घडला. हवेतच असताना आकाशात विमानाचा दरवाजा उघडल्याने काही प्रवासी गुदमरून गेल्याचे वृत्त समोर येत आहे.

दक्षिण कोरियाच्या योनहाप न्यूज एजन्सीने नऊ जणांना रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त दिले आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या फुटेजमध्ये विमानात हवेत उघड्या दारातून वारा वाहताना दिसत आहे, ज्यामध्ये फॅब्रिक सीट-बॅक आणि प्रवाशांचे केस वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने फडफडताना दिसत आहेत व प्रवासी गोंधळून आरडाओरडा करत आहेत. अचानक दरवाजा उघडल्यामुळे अनेकांचा श्वास गुदमरला.

Video: आकाशातच उघडला विमानाचा दरवाजा

हे ही वाचा<< मोलकरणीने लघवीने पुसलं मालकाचं घर, CCTV मुळे झाला खुलासा, पोलिसांना म्हणाली, “मी काम…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राप्त माहितीनुसार, एअरबस A321-200 हे जवळपास २०० प्रवाशांना घेऊन जात होते. डेगू आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीजवळ जेव्हा विमान जमिनीपासून सुमारे २०० मीटर (६५० फूट) वर होते तेव्हा सदर प्रकार घडला. टाइम्सच्या माहितीनुसार, आपत्कालीन एक्झिटजवळ बसलेल्या एका प्रवाशाने लीव्हरला स्पर्श करून हाताने दरवाजा उघडला. दरम्यान, या प्रवाशाला पोलिसांकडे नेण्यात आले आहे आणि त्यांनी दार का उघडले यासंदर्भात चौकशी सुरू आहे असे एशियना एअरलाईन्सने सांगितले.