Bageshwar Dham Dhirendra Krishna Shastri Viral Video: बागेश्वर धाम सरकारचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर अंधश्रद्धा पसरवण्याचा आरोप लावल्याने मध्यंतरी वातावरण बरेच तापले होते . धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर टीका होत असली तरी त्याचा त्यांच्या अनुयायांवर काहीच फरक झालेला नाही असं म्हणणं वावगं ठरणार नाही. उलट या वादामुळे शास्त्री यांच्या लोकप्रियतेत जरा भरच पडली असावी हे दाखवणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. बागेश्वर महाराज या नावाने प्रसिद्ध असलेल्या धीरेंद्र शास्त्री यांचा लंडनमधील भेटीदरम्यानचा हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये एका अतिउत्साही भक्त महिलेने चक्क धीरेंद्र शास्त्रींना मिठी मारली. इतक्यावरच न थांबता पुढे व्हिडिओमध्ये तिने जे केले ते पाहून नेटकरीच काय बाबांचे समर्थक सुद्धा थक्क झाले आहेत.

तुम्ही व्हायरल व्हिडिओमध्ये बघू शकता की, लंडनमध्ये राहणाऱ्या एका महिलेला खूप वर्षांपासून धीरेंद्र शास्त्रींना भेटण्याची इच्छा होती. अखेरीस ते समोर दिसताच ही महिला भान विसरते. ती त्यांना मिठी मारू लागते, गालावर किस घेऊ लागते. हे पाहून क्षणभर शास्त्री सुद्धा गोंधळतात पण त्या महिलेची श्रद्धा समजून ते तिथे तसेच उभे राहतात तर आजूबाजूच्या मंडळींचा चेहरा मात्र खूप मोठा धक्का बसल्यासारखा दिसत आहे.

दरम्यान हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या समर्थकांसह अनेकांनी या महिलेवर टीका केली आहे. तर काहींनी पाश्चिमात्य देशात भेट घेण्याची हीच पद्धत आहे असेही लिहिले आहे. जवळपास २ लाख युजर्सनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. मला सुद्धा बाबांना भेटण्याची इच्छा आहे असे म्हणत अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत.

Video: बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना बघून महिला झाली बेभान

हे ही वाचा<< अर्जुन तेंडुलकरच्या IPL पदार्पणावर सचिनची ‘बाप’ प्रतिक्रिया बघून डोळे पाणावतील! म्हणाला, “जर तू खेळाला आदर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी, बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला होता. अंनिसने धीरेंद्र शास्त्री यांना त्यांच्या चमत्कारिक शक्ती जाहीरपणे सिद्ध करण्याचं आव्हान दिलं होतं, अन्यथा त्यांच्याविरुद्ध पोलीस एफआयआर दाखल करण्यात येईल, असंही समितीने म्हटलं होतं.