Deepika Padukone Viral Video: अभिनेत्री दीपिका पदुकोण मागील काही महिन्यांमध्ये पठाणच्या निमित्ताने प्रचंड वादात सापडली होती. पण अशाप्रकारे चित्रपटातील काही दृश्यांमुळे वादात अडकण्याची ही दीपिकाची पहिली वेळ नाही. यापूर्वी दीपिकाच्या पद्मावत चित्रपटावरून तर अक्षरशः देशभरात गदारोळ झाला होता. करणी सेना विरुद्ध दीपिकाचा पद्मावत हा वाद चाहत्यांना अजूनही आठवत असेलच. विरोध पत्करूनही पद्मावत सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला होता. या यशाने याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे दीपिकाने जीव तोडून केलेलं प्रमोशन.पद्मावतच्या प्रदर्शनाआधी दीपिकाने १०४ ताप असताना प्रमोशन केलं होतं. तिचा कामाप्रतीचा प्रामाणिकपणा दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दीपिकाच्या असंख्य फॅन पेजेसवर सध्या पद्मावतच्या प्रमोशनवेळी दीपिकाने केलेल्या एका डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आता प्रमोशनला जाऊन सेलिब्रिटींनी डान्स करण्यामध्ये काही नाविण्य नाही पण या पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे यावेळी दीपिकाला चक्क १०४ ताप होता. तरीही चेहऱ्यावरचं हसू हलू न देता आणि अजिबात एनर्जी कमी पडू न देता दीपिकाने चित्रपटाच्या घुमर गाण्यावर डान्स केला होता. या व्हिडिओमध्ये तिच्यासह काही महिला सुद्धा नाचताना दिसत आहेत.

Video: १०४ ताप असताना दीपिकाचा भन्नाट डान्स

हे ही वाचा<< मी दीपिका नाही पण… ट्रेन मध्ये दिसलेली ‘ती’, जगातील सर्वात सुंदर महिला!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हा व्हिडीओ जुना असला तरी आता नव्याने पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. आता पुन्हा शेअर केल्यापासून या व्हिडिओला लाखो व्ह्यूज व हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत. यावरून दीपिकाचे कामावरचे आणि तिच्या चाहत्यांचे तिच्यावरचे प्रेम पुन्हा एकदा स्पष्ट दिसून येत आहे.