Viral Video Today: सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे. लग्नाचं घर म्हंटल की पाहुण्यांची रेलचेल असणारच. लग्नाच्या आठवड्याभरापासूनच घरात पाहुण्यांची गर्दी असते आणि खरंतर त्याशिवाय मज्जाही वाटत नाही. पण निदान लग्न झाल्यावर तरी या पाहुण्यांनी आपापली गाठोडी बांधून घरी परत जावं ना? नव्या नवऱ्या नवरीची ही साधी अपेक्षा आपल्याकडे काही लगेच पूर्ण होत नाही. अशाच एका जोडप्याच्या मधुचंद्राच्या रात्री चक्क कुटुंबीय बेडरूममध्ये शिरल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यावेळी नवरीबाई बेडवर बसून अगदी आनंदाने टाळ्या वाजवताना दिसत आहेर पण नवऱ्याचं तोंड बघून तुम्हालाही त्याच्या त्रासाचा अंदाज येऊ शकतो.

व्हायरल व्हिडीओ हा एका फोटोग्राफी पेजवरून शेअर करण्यात आला आहे. जेव्हा सुहागरात (मधुचंद्र) च्या वेळी कुटुंबातील सगळेच बेडरूममध्ये येतात तेव्हा काय होतं.. असा मजकूर या व्हिडिओवर पाहायला मिळत आहे. यात नवदांपत्य त्यांच्या लग्नाच्या कपड्यांमध्येच दिसून येत आहे तर समोर घरातील बहिणी, लेकी टाळया वाजवत नाचताना दिसत आहेत. यावेळी नवरीच्या शेजारी एक छोटा केक ठेवण्यात आला आहे. कदाचित नव्या नवरीचं घरात स्वागत करण्यासाठी त्यांनी हे गोड सरप्राईझ प्लॅन केले असावे.

दरम्यान, हे सरप्राईज त्या नवरीला फार आवडल्याचे दिसतेय कारण ती सुद्धा घरातील इतर सदस्यांच्या प्रमाणेच नाचताना गाताना दिसत आहे. पण नवरोबा थोड्या प्रायव्हसीच्या शोधात असल्याने त्यांना काही या सरप्राईजचं कौतुक वाटत नाही. तरीही सगळ्यांच्या आनंदात सहभागी होऊन नवरा सुद्धा टाळ्या वाजवताना दिसत आहे.

लग्नाच्या पहिल्या रात्री बेडरूममध्ये शिरलं पूर्ण कुटुंब..

हे ही वाचा << Video: भररस्त्यात बाईकवर बेभान जोडप्याने ओलांडल्या सर्व मर्यादा; ‘जो’ मध्ये पडला त्याची अशी झाली अवस्था..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सध्या इंस्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर कमेंट करून हे पाहुणे म्हणजे खरंच कधी कधी वैताग आणतात असं म्हंटल आहे. तर काहींनी या कुटुंबाचं कौतुक करून नवरीचं इतक्या प्रेमाने स्वागत करणं हे खूप गोड आहे असं म्हंटल आहे.