Video : मुलीने वाढदिवसादिवशी ट्रॅक्टरवर मारली एन्ट्री, आनंद महिंद्रा म्हणाले विदेशातही आमच्याच ब्रँडचा जलवा

ट्विटरवर पोस्ट केल्यापासून हा व्हिडीओ एक लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि यावर खूप प्रतिक्रिया येत आहेत.

Anand Mahindra
व्हायरल व्हिडीओ (@anandmahindra / Twitter )

लॅटिन अमेरिकन संस्कृतींमध्ये, मुलीचा १५ वा वाढदिवस हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा मानला जातो. येथे क्विन्सेनेरा म्हणून ओळखल्या जाणार्‍या कमिंग-ऑफ-एज पार्टी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. पण ब्राझीलमध्ये एका मुलीने आपल्या १५ व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी काहीतरी अनोखे केले. क्विन्सेनेरासोबतही तिने काही हटके केलं. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ही मुलगी एका छोट्या ट्रॅक्टरवर बसून पार्टीत प्रवेश करताना दिसत आहे.

आनंद महिंद्रांची पोस्ट

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची इच्छा होती की तिचा १५ वा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा करावा. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, तिचा १५ वा वाढदिवस “ब्राझिलियन संस्कृतीतील एक मोठा मैलाचा दगड” आहे, असं लिहलं, “तिला ट्रॅक्टर आवडतात आणि महिंद्रा ब्रँड आवडतो! म्हणून आमच्या वितरकाने तिला साजरा करण्यासाठी एक छोटा ट्रॅक्टर दिला.”

( हे ही वाचा: बाबा ७५ लाखांचा हुंडा नको, त्यापेक्षा मुलींसाठी वसतीगृह बांधा; वडिलांनी पूर्ण केली मुलीची इच्छा )

काय आहे व्हीडीओमध्ये?

व्हिडीओमध्ये एक मुलगी ट्रॅक्टरवर बसून पार्टीत प्रवेश करत आहे. स्नीकर्ससह गुलाबी पोशाख परिधान करून, ती तिच्या पाहुण्यांना आनंद देण्यासाठी ट्रॅक्टरचे हेडलाइट्स फ्लॅश करते. ट्विटरवर पोस्ट केल्यापासून हा व्हिडीओ एक लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, ज्यावर खूप प्रतिक्रिया येत आहेत.

आनंद महिंद्रा ट्विटरवर खूप सक्रिय आहेत, ज्यावर त्यांचे ८.५ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. ते अनेकदा मनोरंजक पोस्ट शेअर करत असतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Video girl hits entry on tractor on her birthday anand mahindra says jalwa of our brand abroad too ttg

Next Story
video : रक्तस्त्राव ‘तिला’ रोखू शकत नाही !
ताज्या बातम्या