“कधी कोणाचा काळ येईल हे सांगता येत नाही.” मृत्यूला काही काळ वेळ नसते. अपघात अचानक घडतात म्हणूनच वाहन चालवताना वाहतूक नियम पाळण्यास सांगितले जाते पण अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यामुळे रोज कित्यक अपघात होत असतात. अशाच एका थरारक अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.
पुणे-मुंबई महामार्गावरील चांदणी चौकात भीषण अपघात झाला आहे. बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या एका कंटेनरचा मोठा अपघात झाला आहे. अचानक झालेल्या या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसर्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चांदणी चौकात थरारक अपघात (Thrilling accident at Chandni Chowk)
मुंबईकडे जाणाऱ्या या वाहनात बांधकाम कामात वापरल्या जाणाऱ्या जड लोखंडी सळई होत्या. प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला. अचानक समोर आलेल्या कारला वाचवणे कंटेनर चालकाच्या जीवावर बेतले आहे. कार चालकाला वाचवण्यासाठी कंटनेर चालकाने अचानक ब्रेक लावल्यानेमागे ठेवलेल्या लोखंडी सळई थेट केबिनमध्ये घुसल्या. ट्रक चालकाच्या अंगात सळई घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर सहाय्यक गंभीर जखमी झाला. नंतर त्याला आपत्कालीन उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
व्हायरल व्हिडीओ येथे पाहा
अपघातानंतरचे व्हिडीओ व्हायरल
घटनास्थळावरील परिस्थितीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. या व्हिडीओमध्ये अपघातानंतरच्या परिस्थितीचे दृश्य दिसून येत आहेत. व्हिडिओमध्ये दिसते की, कंटनेरच्या केबिनमध्ये अनेक लोखंडी सळया घुसलेल्या दिसत आहे. काही सळया रस्त्यावर पडलेल्या दिसत आहे. बघ्यांची गर्दी झाली आहे तर काही स्थानिक रहिवासी मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थाळी दाखल झाली आहे. केबिनमधून सळया वेगळ्या करण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. दरम्यान काही काळ चांदणी चौकातील वाहतूक विस्कळीत झाली होती. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहत आहे.