Viral Video: लहान मुलांच्या अनेक गोष्टी मोठ्यानं माणसांच्या विचारांच्या पलीकडे असतात. म्हणजे बघा कधी तुमच्याकडून चुकून एखाद्या लहान बाळाला बोट जरी लागलं किंवा जरा आवाज चढवून जरी तुम्ही बोललात तर क्षणात ते रडून घर डोक्यावर घेतात. म्हणजेच चूक भले त्यांची असली तरी रडण्याला घाबरून तुम्हीच त्या बाळाची माफी मागू लागता. पण हेच जर उलट असेल म्हणजे स्वतःच्या खेळण्याच्या नादात एखादं लहान बाळ कुठे धडपडलं तर तुम्हाला त्याची जाणीवही होणार नाही इतके ते शांत वागतात. किंबहुना तुम्ही त्यांना ओरडाल अशी भीती असल्याने स्वतःच ते कसे मला काहीच लागलं नाहीये असं दाखवू पाहतात. अशाच एका चिमुकल्याचा खेळ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तुम्ही बघू शकता की एक चिमुकला एका बास्केटमध्ये बसून जिन्याच्या वरच्या बाजूस बसला आहे. डोक्यात हेल्मेट घालून त्याची तयारी पाहता तो जिन्याच्या पायऱ्यांवरून घसरगुंडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट दिसतेय. हा व्हिडीओ सुद्धा पुढील बाजूला कोणीतरी उभं राहून शूट केला आहे. जेव्हा हा चिमुकला आपला खेळ सुरु करतो तेव्हा त्या घसरगुंडीच्या नादात तो पायऱ्यांवरून थेट खाली पडतो. आता हा व्हिडीओ पाहून आपल्यालाच आधी धडकी भरते पण तो उठून जे तीन शब्द बोलतो ते ऐकून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.

Video: चिमुकला आहे की वादळ?

View this post on Instagram

A post shared by Betch (@bitch)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मुळात @Williamjay या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या अनेक पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हायरल झाल्यापासून या व्हिडिओवर ४० लाखाहून अधिक व्ह्यूज आहेत. अनेकांनी कमेंट करून या व्हिडीओ शूट करणाऱ्या माणसावर टीका केली आहे. तुम्ही जेव्हा बाळा वडिलांसह एकटं सोडता असेही म्हणत काहींनी टोमणे मारले आहेत. हा व्हिडीओ कदाचित पूर्ण तयारीतच बनवलेला असावा पण लहान मुलांना असे खेळ खेळण्यास प्रोत्साहन देऊ नये असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.