Viral Video Today: सोशल मीडियावर व्हायरल होणारे अनेक व्हिडीओ अनेकदा अक्षरशः थरकाप उडवणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या ट्विटरवर तुफान चर्चेत आहे. नशिबाची साथ असेल तर माणूस अगदी मरणाच्या दारातून परत कसा येऊ शकतो हे दाखवणारा हा व्हिडीओ आहे. यामध्ये रस्त्यावर काही बैलांची शर्यत चालू असल्याचे दिसतेय इतक्यात एक माणूस त्या धावण्याच्या रस्त्यात येतो. अर्थात या बैलांचा वेग पाहता हा माणूस नक्कीच आता पायदळी तुडवला जाणार असे वाटते पण त्याच दैव इतकं बलवत्तर की एकदा नव्हे तर दोन वेळा हा माणूस वाचतो. आता इतकं झाल्यावर तरी त्याला थोडी समज यावी असं आपल्याला वाटेल पण उलट तरीही त्याचा उत्साह काही कमी होत नाही आणि मग जे होतं..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की काळ्या रंगाचा टीशर्ट घातलेला एक माणूस अचानक बैलांच्या शर्यतीत त्यांच्याबरोबर धावू लागतो. लांब शिंगं असलेले अनेक मोठमोठे बैल त्याच्या मागे धावताना दिसतात. इतक्यात एक बैल तर त्याला शिंगांनी उचलायला जातो पण सुदैवाने यावेळी तो वाचतो, दुसरा बैल त्याच्यावर पाठून वार करायला जातो पण हा ही आघात हा माणूस चुकवतो व उलट बैलच समोरच्या भिंतीवर जाऊन आदळतो.

एकीकडे हे दोन हल्ले चुकवून हा माणूस रस्त्यावरून धाव घेतो, पण तितक्यात पहिला बैल पुन्हा त्याला मारायला उभा राहतो. यावेळेस मात्र हा माणूस बैलांच्या घरात पुरता अडकलेला दिसत आहे. त्याला चारही बाजूंनी बैल असल्याने कुठेच मार्ग दिसत नाही. अगदी फिल्मी पद्धतीने मग पुढचा किस्सा घडतो. माणसाच्या समोरचा बैल त्याला मारायला धाव घेताच हा माणूस हलकेच बाजूला सरकतो आणि बैल समोरच्या बैलाला जाऊन टक्कर देतो, यामुळे दोन्ही बैल क्षणार्धात खाली कोसळतात.

या व्हिडिओने सोशल मीडिया वापरकर्त्यांची उत्सुकता वाढवली आहे, @uoldguy या अकाऊण्टवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला एक लकी दिवस असे कॅप्शन देण्यात आले आहे आणि ते का हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहूनच कळेल.

बैलांच्या जाळ्यात अडकला माणूस

हे ही वाचा << प्रेमावर श्रद्धा हवी तर अशी; ‘त्या’ ने मृत प्रेयसीशी बांधली लग्नगाठ, अंत्यसंस्कार करून शपथ घेतली की..

दरम्यान हा व्हिडीओ शेअर केल्यापासून, हजारो व्ह्यूज आणि अनेक लाईक्स व कमेंट प्राप्त झाल्या आहेत. ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप समजलेले नाही पण या अशा जीवघेण्या धाडसावरून अनेकांनी टीका केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video man attacked by 4 huge bulls big animals slams each other shocking viral video today svs
First published on: 23-11-2022 at 09:11 IST