scorecardresearch

Video: मुंबई पोलिसांनी समुद्रात बुडणाऱ्या महिलेचे वाचवले प्राण; गेट वे ऑफ इंडियाजवळील घटना

धाडस आणि सतर्कता दाखवत मुंबईचे कोस्टल पोलिस आणि कुलाबा पोलिसांनी महिलेचे प्राण वाचवले घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

The-26-year-old-woman-fell-into-the-sea-after-her-boat-was-hit-by-storm
व्हायरल व्हिडीओ

मुंबईला भेट देण्यासाठी देश-विदेशातून दररोज हजारो पर्यटक येतात. हे पर्यटक एलिफंटा लेणी आणि मांडवाला भेट देण्यासाठी गेटवे ऑफ इंडियाजवळून बोट घेऊन जातात. अशीच एक महिला पर्यटक मुंबईला भेट देण्यासाठी आली होती. गेटवे ऑफ इंडियाजवळील एलिफंटा येथे जाण्यासाठी ती बोटीत बसली. मात्र थोडे अंतर गेल्यावर पाण्याच्या जोरदार लाटा बोटीला आदळल्याने ती महिला अडखळली आणि समुद्रात पडली. धाडस आणि सतर्कता दाखवत मुंबईचे कोस्टल पोलिस आणि कुलाबा पोलिसांनी एका महिलेचे प्राण वाचवले आहेत.

घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या सागरी सुरक्षा पथक स्पीड बोट घेऊन महिला बोटीतून पडलेल्या ठिकाणी पोहोचले. तेव्हा मुंबई पोलिसांनी जीव धोक्यात घालून दोरी फेकून महिलेला आपल्याकडे ओढले. ती दोरी पकडण्यात महिलेला यश आले. अशा प्रकारे तो तरुणीला समुद्राच्या वर खेचण्यात यशस्वी झाला.

(हे ही वाचा: न्यूटनच्या चौथा लॉ आणि करोनाचा काय संबंध? लहानग्याचा भन्नाट शोध एकदा पाहाचं)

जीवाची बाजी लावत वाचवले प्राण

महिलेला बोटीवर परत आणण्यासाठी मुंबई पोलीस आणि सागर रक्षक या जवानांनी जीवाची बाजी लावली. महिलेला समुद्रात बुडू दिले नाही. खूप प्रयत्नानंतर तिला पुन्हा बोटीवर आणण्यात यश आले. या संकटाच्या वेळी संयमाने आणि धैर्याने बोटीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत राहिल्याबद्दल त्या महिलेचेही कौतुक करावे लागेल. तिने धीर सोडला नाही. मुंबई पोलिसांनी जीव मुठीत घेऊन कर्तव्य पार पाडण्याची ही पहिलीच वेळ नाही. मुंबई पोलीस अनेकदा अशी कामे करत असतात, ज्यामुळे त्यांच्यासाठी लोक त्यांना नेहमी मनापासून सलाम करतात.

(हे ही वाचा: नागालँडच्या पर्वतांमध्ये पहिल्यांदाच दिसला क्लाउडेड बिबट्या, फोटो Viral)

(हे ही वाचा: तो कुत्रा आहे असं वाटतंय? मग हा Viral Video शेवटपर्यंत बघाचं!)

या मुंबई पोलीस जवानाच्या शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संपूर्ण घटनेचा व्हिडीओही जारी केला आहे. मुंबई पोलिसांच्या कर्तव्याचे कौतुक करत मुंबईकरांना पुन्हा एकदा पोलिसांचा अभिमान वाटण्याचे कारण मिळाले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video mumbai police rescues drowning woman the incident took place near gateway of india ttg

ताज्या बातम्या