Viral Video : भारतात आयपीएल एखाद्या उत्सवाप्रमाणे असतो. दरवर्षी मार्च एप्रिल महिन्यात आयपीएल सुरू होते. आधीच भारतात क्रिकेट अतिशय लोकप्रिय आहे अशात आयपीएल एक मनोरंजनाचं महत्त्वाचं साधन आहे.
आयपीएलच्या प्रत्येक सामन्याला स्टेडियम चाहत्यांनी भरलेला असतो. आयपीएलमध्ये एकूण दहा संघ खेळतात. प्रत्येक संघाचे फॉलोअर्स त्यांच्या संघाला प्रोत्साहन देतात. काही लोक सोशल मीडियाद्वारे तर काही लोक प्रत्यक्षात स्टेडियमवर जाऊन आवडत्या खेळाडूंना आणि संघाला चीअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शरीरावर बँडेज बांधून थेट स्टेडियममध्ये मॅच पाहायला एक तरुण आलेला दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् होईल.

या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण शरीराला बँडेज बाधून थेट स्टेडियमध्ये पोहचला आहे. त्याच्या हातात लखनऊ सुपर जायंट्स संघाचा झेंडा आहे. झेंडा फिरवत तो लखनऊ संघाला सपोर्ट करताना दिसत आहे.
व्हिडीओत तुम्हाला दिसेल की या तरुणाने शरीरावर बँडेज लावले आहे आणि त्याच्या आवडत्या टीमला प्रोत्साहन देत आहे. झेंडा हात फिरवताना त्याला त्रास सुद्धा होतो पण पण तो उत्साहाच्या नादात त्याकडे दुर्लक्ष करतो. तुम्ही आजवर अनेक आयपीएल चाहत्यांचे व्हिडीओ पाहिले असेल पण असा व्हिडीओ कदाचित पहिल्यांदाच पाहाल.

पाहा व्हायरल व्हिडीओ

naughtyworld या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आपल्यासाठी मॅच पाहणे महत्त्वाचे आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हा तरुण सिद्ध करतोय की ऋषभ पंतचा खूप मोठा चाहता आहे” तर एका युजरने लिहिलेय, “तिकिट अपघातापूर्वी बूक केली असावी” आणखी एका युजरने लिहिलेय, “फेमस होण्यासाठी नाटक करत आहे” अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सनी हा ऋषभ पंतचा मोठा चाहता असल्याचे लिहिले आहे. काही युजर्सनी त्याच्यावर टिका केली आहे.