सोशल मीडियावर कित्येकवेळा सापांचे व्हिडिओ समोर येत असतात. कधी पंख्यावर लटकणारा साप तर कधी शॉवरवर लटकणरा. पण आता चक्क एटीएम मशीनमध्ये साप शिरल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. काही काळापूर्वी, तामिळनाडूमधील एटीएम किओस्कमध्ये साप दिसल्याच्या व्हिडिओने नेटकऱ्यांना घाबरवले होते. नुकतीच गाझियाबादच्या गोविंदपुरी भागात अशीच आणखी एक घटना घडली आहे.

ट्विटरवर कर्नल डीपीके पिल्ले यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, एटीएममध्ये साप शिरत असल्याचे दिसत आहे. “हे स्वतःहून बाहेर येईल, दूर राहा,” व्हिडिओमध्ये एक व्यक्ती असे म्हणताना ऐकू येते.

एटीएम मशीनमध्ये शिरला साप

”बँकांच्या बोर्डरूममध्ये साप असल्याचे ऐकले असेल पण तुम्ही एटीएममध्ये घुसणारे साप कधीही पाहिले नसेल. मला वाटते की एनपीए संपवल्यानंतर केल्यानंतर आणि फोन बँकिंगद्वारे मिळणारी कर्ज वितरण सेवा थांबवल्यानंतर सिस्टममध्ये जाऊन पैसे काढण्याचा मार्ग सापाने शोधावा असावा. हा व्हिडिओ पाहून मला नागिन चित्रपटाची आठवण झाली” असे कर्नल पिल्ले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा – भटक्या कुत्रीचं केलं ‘Baby Shower’; व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘नसबंदी…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया

ऑनलाइन शेअर केल्यापासून हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. काहींनी एटीएमला त्यांच्या पुढच्या भेटीत साप दिसेल का याबद्दल चिंता व्यक्त केली, तर काहींनी”सरपटणारा साप बँकेत “hiss-ab ( हिशोब) तपासण्यासाठी भेट देत” असल्याचे सांगत मजेशीर प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – घाबरलेल्या घोड्याने थेट स्विमिंग पूलमध्येच मारली उडी अन्….बचाव कार्याचा व्हिडीओ व्हायरल

एकंदर हा व्हिडिओ पाहून सर्वांनी एटीएममध्ये गेल्यानंतर सावध राहिले पाहिजे हे लक्षात ठेवा.