प्रेम सर्वजण करतात. मात्र, शेवटच्या श्वासापर्यंत ते प्रेम जपण्याचे आणि सोबत राहण्याचे वचन फार कमी लोक पाळतात. ज्या लोकांनी हे वचन पाळलंय त्यांचे प्रेम नेहमीच इतरांसाठी एक उदाहरण बनले आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एका वृद्ध पत्नीने आपल्या आजारी वृद्ध पतीसाठी गाणे गायले आहे. तिने गायलेले गाणे ऐकून तिचे तिच्या नवऱ्याप्रती असणारे प्रेम पाहून हृदय भरून येईल. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ भारतातील नाही, पण प्रेमाला कोणत्याही भाषेची गरज नाही असं म्हणतात ना,कदाचित त्यामुळेच स्पेनचा हा व्हिडिओ जगभरात प्रेमाचा संदेश देत आहे.

गुडन्यूज_मूव्हमेंट अकाऊंटवरून हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये “हमेशा के लिए असे लिहिले आहे. ७० वर्षांची पत्नी पतीची सेवा करते, असेही यात देण्यात आले आहे. तब्बल ७० दिवसांनंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याने ती हे गाणे गात आहे.

( हे ही वाचा: भुकेलेल्या सिंहाच्या कळपामध्ये अडकली बिचारी म्हैस; पुढे असं काही घडलं की…Viral Video पाहून तुमचाही थरकाप उडेल)

व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक वृद्ध व्यक्ती हॉस्पिटलच्या बेडवर पडून असल्याचे दिसत आहे. तर वृद्ध स्त्री म्हणजेच त्याची पत्नी त्याचा हात धरून त्याच्यासाठी गाणे म्हणत आहे आणि आपल्या पतीचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा ती म्हातारी गात असते. तेव्हा तिचा नवरा थरथरत्या हातांनी तिच्या चेहऱ्याला प्रेमाने स्पर्श करताना दिसतो. हा व्हिडिओ खूपच भावूक आहे.

नवऱ्यासाठी गाणे गाणाऱ्या वृद्ध पत्नीचा व्हिडिओ येथे पाहा

( हे ही वाचा: Baba Vanga: नवीन युगातील बाबा वेंगा बनली ‘ही’ १९ वर्षीय युवती; २०२२ मध्ये तिने केलेल्या ‘या’ भविष्यवाण्या ठरल्यात खऱ्या)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा भावूक व्हिडिओ आतापर्यंत २ लाख ४० हजारांहून अधिक लोकांनी पाहिला असून अनेकांनी या व्हिडिओला लाईक देखील केले आहे. अनेक यूजर्स सुंदर कमेंट्सही करत आहेत. हा व्हिडिओ बॉलीवूड अभिनेत्री कोंकणा सेन आणि अनुष्का शर्मालाही आवडला आहे. एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, हे खूप भावूक आहे. आणखी एका युजरने ‘खरे प्रेम’ लिहिले.