अंकिता देशकर

Traffic Signal Melted Due To Heat: विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक इमेज मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे, ज्यात लखनऊमध्ये वाढत्या तापमानामुळे चक्क एक ट्रॅफिक सिग्नल वितळल्याचे दिसून येत आहे. दरम्यान लाइटहाऊस जर्नलिझमच्या तपासात या दाव्याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर Irshad Khan ने व्हायरल चित्र आपल्या प्रोफाइल वर शेअर केले. .

बाकी यूजर्स देखील हा दावा शेअर करत आहे.

हे चित्र ट्विटर वर देखील शेअर करण्यात येत आहे.

तपास:

आमचा तपास आम्ही साध्या गूगल रिव्हर्स इमेज सर्च पासून केला. आम्हाला सर्वप्रथम एक फेसबुक पेज वर हा फोटो शेअर केलेला आढळून आला.

Kuwait UPTO DATE ने शेअर केले कि ट्रॅफिक सिग्नल वाढलेल्या तापमानामुळे नाही तर त्या सिग्नलजवळ एका कारला आग लागल्याने वितळला होता. या पोस्ट वरून आम्ही पुढचा तपास किवर्ड सर्चच्या माध्यमातुन सुरु केला.

या व्हिडिओमध्ये एक कार जळताना दिसते आणि त्यावर एक ट्रॅफिक सिग्नल वितळताना दिसत आहे.

जळत्या कारमुळे सिग्नल वितळल्याचा उल्लेखही पोस्टवरील कमेंटमध्ये करण्यात आला आहे.

आम्ही ईमेलवर अरब टाइम्सशी देखील संपर्क केला. २०१३ मध्ये ट्रॅफिक सिग्नलजवळ एका कारला आग लागल्याने ट्रॅफिक सिग्नल वितळल्याचे संस्थेने आम्हाला सांगितले.

हे ही वाचा<< शिर्डी साईबाबा मंदिरातली देणगी कुठे जाते बघा म्हणत व्हायरल केला Video; ‘हिंदूंनो डोळे उघडा’ सांगणाऱ्या ट्वीटचं सत्य काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष: ट्रॅफिक सिग्नल उष्णतेने वितळत असल्याची व्हायरल प्रतिमा लखनऊ ची नसून कुवेतची आहे. एका कारला आग लागल्याने त्यापाशी असलेला ट्रॅफिक सिग्नल वितळला होता.