Umpire Dancing On Chandra: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट क्रिकेट सामन्यांमध्ये सध्या क्रिकेटप्रेमी गुंतले आहेत. भारतीयांचे क्रिकेटप्रेमी काही नव्याने सांगायला नको. आपल्याकडे अगदी गल्लोगल्लीही इंटरनॅशनल नियम पाळून वेळप्रसंगी त्यात बदल घडवून क्रिकेट खेळलं जातं. याच गल्ली क्रिकेटच्या सामन्यांमधून आजपर्यंत भन्नाट टॅलेंट समोर आले आहे. टॅलेंट म्हणजे फक्त बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंगच नव्हे तर अगदी अंपायरिंग करताना सुद्धा लोकं कमालीचं कौशल्य दाखवतात. असाच एक सांगलीतील अंपायर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भरमैदानात खेळ सुरु असताना या अंपायरच्या अंगात अचानकच चंद्रमुखी संचारली आणि मग जे घडलं ते पाहून तुम्हीही हसून हैराण व्हाल.

२०२२ चा गाजलेला मराठी चित्रपट चंद्रमुखीच्या चंद्रा लावणीवर आजतागायत हजारो रील्स बनवले गेले असतील. फक्त मुलीच नाही तर मुलांनाही वेड लावणारं हे गाणं ठरलं होतं. सांगलीमध्ये अलीकडेच पार पडलेल्या एका स्थानिक क्रिकेटच्या सामन्यातही या चंद्राची क्रेझ दिसून आली. सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मध्ये सामना सुरु असताना अचानक अंपायर चंद्रा गाण्यावर नाचू लागले. नुसता नाच नाही तर ज्या काही स्टेप्स व अदा त्यांनी दाखवल्या त्यापाहून नेटकरी पार घायाळ झाले आहेत.

Video: अंपायरच्या अंगात संचारली चंद्रा

हे ही वाचा<< मास्टरशेफ बनायला गेली मीम बनून आली! पाकिस्तानच्या ‘या’ ‘बिर्याणी गर्ल’चा Video चुकूनही मिस करू नका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हा व्हिडीओ आकाश भोर या अकाऊंटवरून शेअर करण्यात आल्यापासून यावर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. ट्विटरवर सुद्धा हा व्हिडीओ शेअर केला जात असून त्यात काहींनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे संदर्भ सुद्धा जोडले आहेत. अनेकांनी या व्हिडिओच्या कमेंटमध्ये अंपायरच्या भन्नाट डान्ससह कमाल कॉन्फिडन्सला सुद्धा दाद दिली आहे.