VIDEO viral: सोशल मीडिया हे माहितीचं भंडार आहे. इथे अशा काही गोष्टी पाहायला किंवा ऐकायला मिळतात की कधीकधी त्यामुळे धक्काच बसतो. तर कधीकधी इथे मीम मटेरीयल देखील व्हायरल होतं, ज्याला कधी लोक डोक्यावर घेतात तर कधी ट्रोल करतात. हल्ली मुलांना मुली मिळणं कठीण झालंय. स्वभाव, कुटुंब व अनुरूपता न पाहता शेती-नोकरी, पगार, गाडी, स्वतःच घर आणि कुटुंबातील कमी सदस्यसंख्या यावरच हल्ली लग्न ठरत असतात. नणंद, दिर नको, सासू-सासऱ्यांपासून नवरा वेगळा हवा, त्याचा पुण्यात फ्लॅट हवा, अशा अपेक्षा सध्या मुलींसह पालकांकडून व्यक्त होत आहे. ‘असलाच नवरा पाहिजे हं…’ अशा मानसिकतेच्या मुलींमुळे अनेक मुले लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत.

‘मुलाला शेती पाहिजे; पण तो शेतकरी नवरा नको आहे. पुणे, मुंबई किंवा इतर ठिकाणी नोकरी करणारा असावा. शहरात स्थायिक असावा. अशी मानसिकता मुलींबरोबर त्यांच्या आई-वडिलांचीही झाली आहे. तर मुलाचे लग्न ठरत नसल्याने शेतकरी मातापित्याच्या जिवाला घोर लागला आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था मुलांचे विवाह जमत नसल्याने बिकट झाली आहे. दरम्यान याच सगळ्या अपेक्षांना वैतागलेल्या एका कवीनं मुलींच्या आणि मुलींच्या पालकांचे डोळे उघडणारी कविता केली आहे. ही कविता ऐकून तु्म्हालाही शेतकऱ्यातला आणि शहरात नोकरी करणाऱ्यातला फरक कळेल.

लग्नासाठी स्थळं पाहणाऱ्या प्रत्येक बापानं अन् मुलीनं पाहावा असा VIDEO

२ BHK 3 BHK फ्लॅटला तू ताजमाल म्हणून फसू नको
तुझ्या बापाच्या घराला १०-५ गुंठ्याचं अंगण आहे,तू मात्र खुराड्यात जाऊन बसू नको.

मोबाईलवरच्या अनलिमिटेड पावसात कधीच कुणी भिजत नाही, शहरामधल्या पाचव्या मजल्यावर कुठलंच सुख रुजत नाही.

भिजायचं असेल रुजायचं असेल तर हवी असते माती अन् खऱ्या खुऱ्या पावसाची सर, तुला आयुष्य करायचं असेल हिरवं गार..तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर

नोकरी नोकरी काय करते, नोकर नोकर असतो, ऑफिसमध्ये साहेबांपुढे तो मान घालून बसतो.
इथं बांधाच्या सिंहासनावर अन् सोनेरी आकाशाच्या छताखाली जेव्हा माझा बळी बसतो तेव्हा या हिरव्यागार साम्राज्याचा तो एकमेव सम्राट असतो.

पेन्शनच त्याला कधीच नसतं टेन्शन कारण माती कधीट रिटायर होत नाही..पायलीभर परले दाणे तर वर्षभर पुरेल इतकं देते काळीआई..
म्हणून तुला अन् तुझ्या पुढल्या पिढ्यांना उपाशी रहायचं नसलं तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर

पाहा व्हिडीओ

गावोगावी शेतीचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. नोकरी आज आहे तर उद्या नाही. जमीन पिढ्यान् पिढ्या राहणार आहे. शेती तोट्यात असणारी भविष्यात फायद्यात येईल तर मुलींनी स्वतः पुढे येऊन शेतकरी मुलाला लग्नाला होकार दिला पाहिजे.