युनिस वादळाच्या जोरदार वाऱ्याने युनायटेड किंगडमला झोडपले असताना, हिथ्रो विमानतळावरचे काही व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. या धोकादायक युनिस वादळात एअर इंडियाच्या विमानाने नेत्रदीपक लँडिंग केलं. या लँडिंगचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे दृश्य कॉकपिटच्या आतील आहे. हे जबरदस्त फुटेज व्हायरल होत आहे.बोईंग ७७७ विमानाचे लँडिंग हा एक क्षण वेगळा ठरला. श्वास रोखून, प्रेक्षकांनी जगातील सर्वात मोठे ट्विनजेट विमान धावपट्टीवर जाताना स्थिर राहण्याचा प्रयत्न करताना पाहिले. कॅप्टन खलिफा अल-थानी हे विमान उडवत होते आणि त्यांनीच कॉकपिटमधलं हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केलं आहे.

अल थानी यांनी जमिनीवरून दिसणार्‍या दृश्याशी जुळवून घेत विमानाला सुरक्षितपणे उतरण्यासाठी काय करावे लागेल हे दाखवले. “स्टॉर्म युनिस लँडिंग – आजच्या अप्रतिम कव्हरेजसाठी आणि बाह्य फुटेजसाठी ‘बिग जेट टीव्ही’चे खूप खूप आभार,” त्यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करताना लिहिले.

(हे ही वाचा: Video: UK च्या विमानतळावर तुफान वादळात एअर इंडियाच्या विमानाचं लँडिंग; भारतीय पायलटचं होतंय कौतुक)

वारा जोरदार असला तरी, पायलट मातर एकदम शांत दिसत होते आणि त्यांच्या शांततेने सर्व थक्क झाले आहे.

(हे ही वाचा: ‘या’ व्हायरल फोटोत दडलेला आकडा तुम्ही सांगू शकता का? ९९ टक्के लोक ठरले अपयशी)

युनिस वादळाने, १००mph पेक्षा जास्त वेगाने वाहणारे वारे आणले, त्यामुळे संपूर्ण युनायटेड किंगडमची परिस्थिती बिघडवली. झाडे उन्मळून पडली आणि घरे उद्ध्वस्त झाल्यामुळे ब्रिटनमध्ये तीन दशकांतील ही सर्वात वाईट घटना असू शकते असे तज्ञांचे मत आहे. शनिवारी वादळाचा आकडा ९ वर पोहोचला.

(हे ही वाचा: रोहितला राग अनावर! भुवीने कॅच सोडताच चेंडूला मारली लाथ; Video Viral)

लंडनमध्ये प्रथमच लाल हवामानाची चेतावणी जारी करण्यात आली होती, जेथे भयंकर वादळाने प्रतिष्ठित O2 अरेनाच्या छताचा एक भाग उखडून टाकल्याचे दिसले.

(हे ही वाचा: मणिपूरच्या कलाकारांसोबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी धरला ठेका; सोशल मीडियावर Video Viral)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
(Source: Reuters)

बहुतेक उड्डाणे रद्द करण्यात आली असताना, वादळाच्या दरम्यान सुरक्षित लँडिंग करण्याचा प्रयत्न करणारे काही अजूनही होते.